शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

...तर भारत ‘चॅम्पियन’ बनू शकतो

By admin | Updated: January 15, 2015 04:27 IST

फलंदाजीच्या शानदार क्रमवारीच्या बळावर गतविजेता टीम इंडिया पुन्हा एकदा विश्वचषकात चॅम्पियन बनू शकतो,

नवी दिल्ली : फलंदाजीच्या शानदार क्रमवारीच्या बळावर गतविजेता टीम इंडिया पुन्हा एकदा विश्वचषकात चॅम्पियन बनू शकतो, असे मत माजी कोच जॉन राईट यांनी व्यक्त केले.६० वर्षांचे जॉन राईट म्हणाले, ‘सध्याच्या संघाचा फलंदाजी क्रम २०११ च्या विश्वविजेत्या संघासारखाच आहे. अनुभवी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांची पुरेपूर साथ लाभल्यास भारत निश्चितपणे जेतेपदाचा हकदार राहील. गतवेळेच्या तुलनेत सध्याच्या संघात युवा जोश आहे. काही नवे चेहरे आहेत. विश्वचषकात निकाल हे लवकर गडी बाद करण्यावर आणि झेल घेण्यावर अवलंबून असतात.’सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षकपद सांभाळणारे राईट पुढे म्हणाले, ‘आॅस्ट्रेलियात कसोटी मालिका आणि नंतर तिरंगी मालिका खेळणाऱ्या भारतीय संघाला विश्वचषक खेळण्यासाठी भरपूर संधी मिळणार आहे. पण आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या या विश्वचषकात जेतेपद मिळविण्यासाठी गोलंदाजी तसेच फिल्डिंगमध्ये सुधारणेस वाव असेल.’१४ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या क्रिकेटच्या महाकुंभात विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे खेळाडू महत्त्वपूर्ण भूमिका वठवतील, असे भाकीत करीत राईट म्हणाले, ‘आॅस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत विराटने नेतृत्वगुणांची चमक दाखविली आहे. कर्णधारपद हे कोचिंगसारखेच असून यात उत्कृष्ट कामगिरी करण्यासोबतच उत्तम नेतृत्व देखील करावे लागते. विराटने दोन्ही आघाड्यांवर यशस्वी काम केले. रोहित हा क्षमतावान आणि मॅचविनर आहे. वीरेंद्र सेहवाग आणि युवराज यांना संधी न मिळाल्याबद्दल राईट यांनी निवडकर्त्यांसाठी हा कठीण निर्णय असल्याचे सांगून भविष्यात भारतीय संघाचे कोच बनणार असल्याची शक्यता फेटाळून लावली.(वृत्तसंस्था)