शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

भारत ठोकणार विजयाचा ‘षट्कार’

By admin | Updated: March 14, 2015 00:23 IST

पाचही सामन्यांत वर्चस्वपूर्ण कामगिरी करून विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक देणाऱ्या चॅम्पियन भारतीय संघाचा उद्या शनिवारी ‘ब’ गटाचा

आॅकलंड : पाचही सामन्यांत वर्चस्वपूर्ण कामगिरी करून विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक देणाऱ्या चॅम्पियन भारतीय संघाचा उद्या शनिवारी ‘ब’ गटाचा अखेरच्या साखळी लढतीत झिम्बाब्वेविरुद्ध विजयाचा ‘षट्कार’ खेचण्याचा निर्धार कायम आहे. भारताने उद्या विजय मिळविल्यास सलग सहावा तसेच विश्वचषकात तो दहावा विजय ठरेल.विंडीजवरील विजयाचा अपवाद वगळता अन्य सर्वच सामने भारताने एकतर्फी जिंकले. विंडीजने वाका मैदानावर भारताला कडवे आव्हान दिले होते. झिम्बाब्वेविरुद्धचा सामना औपचारिक असेल; पण या सामन्यातही वर्चस्व गाजविण्याची तयारी आहे. ईडन पार्कमध्ये भारतीय खेळाडू सरावाच्या दृष्टीने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात उत्कृष्ट कामगिरी करण्यात कसर शिल्लक ठेवणार नाहीत. भारताने २०११च्या विशचषकात अखेरचे ४ सामने जिंकले. सध्याच्या स्पर्धेत उद्या विजय साजरा झाल्यास ‘परफेक्ट टेन’ नोंदविण्यात यश येईल.आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये विश्वचषकासाठी ज्या खेळपट्ट्या बनविण्यात आल्या, त्या फलंदाजांना अनुकूल मानल्या जातात. भारताची फलंदाजी भक्कम आहे. सर्व सातही फलंदाजांनी धावा काढल्या असल्याने संघात बदल करण्याचे कारण नाही. गोलंदाजांनीही प्रतिस्पर्धी संघाला ५ सामन्यांत बाद केले. कर्णधाराच्या डावपेचांचे तंतोतंत पालन करून शमी, आश्विन आणि मोहित शर्मा यांनी सर्वच फलंदाजांना त्रस्त केले. शमीने १२, तर आश्विनने ११ गडी बाद केले आहेत. आश्विन फलंदाजांवर दबाव टाकण्यात तरबेज मानला जातो. उमेश यादव आणि रवींद्र जडेजा यांनीदेखील स्वत:चे काम चोखपणे बजावले. क्षेत्ररक्षणातही भारतीय खेळाडू मागे नाहीत. अप्रतिम झेल आणि क्षेत्ररक्षणाद्वारे त्यांनी चाहत्यांचे लक्ष वेधले. भारतीय संघाची भक्कम बाजू ही फलंदाजी आहे. शिखर धवन ३३३ धावांसह पहिल्या ५ फलंदाजांमध्ये सहभागी झाला आहे.झिम्बाब्वेबाबत बोलायचे झाल्यास कर्णधार एल्टन चिगुम्बुरा जखमी झाल्याने ब्रँडन टेलर नेतृत्व करेल. विश्वचषकानंतर निवृत्तीची टेलरने घोषणा केली आहे. झिम्बाब्वे भारतासाठी अडथळा ठरेल, असे वाटत नाही; पण हा संघ तगडे आव्हान देऊ शकतो. टेलर व सीन विलियम्स यांनी खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांचा भक्कम सामना केल्यास लढत रंगतदार होईल. (वृत्तसंस्था)