साखरपुडा केला तर, लपवू कशाला ? - विराट कोहली

By Admin | Updated: December 30, 2016 11:34 IST2016-12-30T11:03:47+5:302016-12-30T11:34:35+5:30

विराट आणि अनुष्का नववर्षाच्या स्वागतासाठी उत्तराखंडमध्ये गेले आहेत. बुधवारी रात्री हरिव्दार इथे या दोघांना गुरुंचा आशिर्वाद घेताना एकत्र पाहण्यात आले.

If you want to hide, why not hide? - Virat Kohli | साखरपुडा केला तर, लपवू कशाला ? - विराट कोहली

साखरपुडा केला तर, लपवू कशाला ? - विराट कोहली

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 30 - भारताच्या कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने अनुष्का शर्माबरोबर साखरपुडा झाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. विराट आणि अनुष्का नववर्षाच्या स्वागतासाठी उत्तराखंडमध्ये गेले आहेत. बुधवारी रात्री हरिव्दार इथे या दोघांना गुरुंचा आशिर्वाद घेताना एकत्र पाहण्यात  आले. त्यानंतर या दोघांचा साखरपुडा होणार असल्याची जोरदार चर्चा माध्यमांमध्ये सुरु होती. 
 
विराट-अनुष्का उत्तराखंडच्या नरेंद्रनगरमधील ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत तिथे  अमिताभ बच्चन, अनिल अंबानी, टीना अंबानी आणि भारतीय टीममधील काही क्रिकेटर गुरुवारी येणार अशी चर्चा होती. आम्ही साखरपुडा केलेला नाही, साखरपुडा केलाचं तर लपवू कशाला ? वृत्तवाहिन्या अफवा पसरवून तुमचा गोंधळ वाढवत आहेत असे विराटने टि्वट केले आहे. 
 
आणखी वाचा 
 
बुधवारी अनुष्काने इंस्टाग्रामवर उत्तराखंडातील एक व्हिडीओदेखील शेअर केला होता. ज्यात ती मोराला खाद्य देताना दिसत आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार, विराट कोहली उत्तरांखडचा ब्रँड अॅम्बेसिडर आहे. 
 

Web Title: If you want to hide, why not hide? - Virat Kohli