शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

गोल्फादेवीचे विजेतेपद

By admin | Updated: April 21, 2015 06:31 IST

नावाजलेल्या गोल्फादेवी संघाने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना चुरशीच्या झालेल्या सामन्यात तगड्या विजय क्लबला ८-४ असे रोखून नुकत्याच झालेल्या

मुंबई : नावाजलेल्या गोल्फादेवी संघाने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना चुरशीच्या झालेल्या सामन्यात तगड्या विजय क्लबला ८-४ असे रोखून नुकत्याच झालेल्या कुमार गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे शानदार विजेतेपद पटकावले. या विजेतेपदासह गोल्फादेवी संघाने १५ हजार रोख रुपयांच्या पारितोषिकावरही कब्जा केला.नवोदित संघाच्या वतीने ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखानावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ करताना अखेरपर्यंत कडवी झुंज दिली. शेवटच्या ५ मिनिटांत शार्दुल हरचकरने एकाच चढाईत ३ गडी मारत सामना विजय क्लबच्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला. मात्र तुषार दुडीयेचा चतुरस्र खेळ आणि विवेक बिजम, दुर्वेश पाटील यांचे दमदार संरक्षण या जोरावर गोल्फादेवीने बाजी पलटवताना ४ गुणांनी विजेतेपद निश्चित केले.तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीमध्ये विजय क्लबने झुंजार विजय मिळवताना कसलेल्या शिवशक्तीला २४-२२ असे नमवून अंतिम फेरी गाठली होती. सावध सुरुवात केलेल्या विजय क्लबने या सामन्यात मध्यांतरानंतर वेगवान खेळ केला. तर गोल्फादेवीने एकहाती वर्चस्व राखताना सहज आगेकूच करीत विजय बजरंग व्यायामशाळेचा २०-१२ असा पराभव केला होता. (क्रीडा प्रतिनिधी)