शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कसोटीपटूंना मिळणार ‘डबल कमाई’

By admin | Updated: October 3, 2016 06:06 IST

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या कसोटीपटूंना आनंदाची बातमी देताना त्यांच्या मानधनामध्ये तब्बल दुप्पट वाढ केली आहे.

मुंबई : क्रिकेटविश्वातील सर्वांत श्रीमंत संघटना म्हणून ओळखली जाणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या कसोटीपटूंना आनंदाची बातमी देताना त्यांच्या मानधनामध्ये तब्बल दुप्पट वाढ केली आहे. क्रिकेटचे पारंपरिक रूप असलेल्या ‘कसोटी’ क्रिकेटकडे अधिक आकर्षक बनविण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले.सध्या भारतीय क्रिकेटपटूंना प्रत्येक कसोटी सामन्यासाठी सात लाख रुपयांचे मानधन मिळते; मात्र आता बीसीसीआयने यामध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याने यापुढे प्रत्येक खेळाडूला एका सामन्यासाठी १५ लाख रुपये मिळतील. त्याचवेळी बीसीसीआयने राखीव खेळाडूंच्या मानधनामध्येही दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, राखीव खेळाडूंना ७ लाख रुपये मिळतील. मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये बीसीसीआयने हा निर्णय घेतला. यासंबंधी बोर्डचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, ‘कसोटी क्रिकेटला अधिक प्राधान्य देण्याच्या हेतूने आम्ही खेळाडूंच्या सामना मानधनामध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला. कसोटी क्रिकेटला अधिक आकर्षक आणि नवीन पिढीसाठी अधिक जवळचे करण्यासाठी आम्ही या वेळी चर्चा केली. कसोटी क्रिकेटप्रती आपल्याला खेळाडूंची आवड कायम ठेवायची असल्यास, त्यांच्या मानधनामध्ये वाढ करणे गरजेचे आहे.’ (वृत्तसंस्था)