शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पूजाची तिरंदाजीमध्ये निराशाजनक कामगिरी

By admin | Updated: September 12, 2016 00:37 IST

रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेच्या रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात भारताच्या पूजाला प्राथमिक फेरीत ५१३ गुणांसह २९व्या स्थानांवर समाधान मानावे लागले.

रिओ : रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेच्या रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात भारताच्या पूजाला प्राथमिक फेरीत ५१३ गुणांसह २९व्या स्थानांवर समाधान मानावे लागले.  पूजाने आपल्या पहिल्या सहा संधीमध्ये ९, ८, ८, ८, ७ आणि ९ अशा गुणांचा वेध घेत एकूण ४७ गुण मिळवले. यानंतर मात्र तिने दुसऱ्या सेटमध्ये शानदार पुनरागमन करताना १०, ९, ८, ८, ८ आणि ७ अशी कामगिरी करीत एकूण ५० गुण मिळवले, तर तिसऱ्या आणि चौथ्या सेटमध्ये पूजाची कामगिरी खालावली. यावेळी तिला अनुक्रमे ४३ व ४५ गुणांवरच समाधान मानावे लागले. यानंतर पूजाच्या कामगिरीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पुन्हा एकदा दडपणाखाली आल्याने पाचव्या व सहाव्या फेरीमध्ये अनुक्रमे ४१ आणि ४४ गुणांसह एकूण ५१३ गुणांसह तिला २९व्या स्थानी समाधान मानावे लागले. दुसरीकडे, नेमबाजीमध्येही भारतीयांसाठी निराशाजनक कामगिरी झाली. भारताच्या नरेश कुमारला १० मीटर एअर रायफल प्रोन प्रकारामध्ये ४४ व्या स्थानी समाधान मानावे लागल्याने पात्रता फेरीतच त्याचे आव्हान संपुष्टात आले.

शनिवारी झालेल्या या स्पर्धेत नरेशने ६०६.५ गुणांचा वेध घेतला. यावेळी ४४ व्या स्थानी राहिल्याने अंतिम फेरीतील प्रवेशापासून तो मुकला. चार फेरींमध्ये त्याने अनुक्रमे १००.६, १०१.९, ९८.६ आणि १०१.४ अशा गुणांचा वेध घेतला. त्याचवेळी स्लोवाकियाच्या वेरोनिका वाडोविकोवा याने सर्वाधिक ६३६.७ गुणांसह अग्रस्थान मिळवले.

विशेष म्हणजे, याआधी नरेशचे १० मीटर एअर रायफल स्टॅँडिंग एसएच १ प्रकारातही आव्हान संपुष्टात आले होते. यामध्ये पात्रता फेरीत अत्यंत खराब प्रदर्शनासह तो तळाला राहिला. एकूण चार सीरिजमध्ये नरेशने एकूण ५८३ गुणांचा वेध घेतला होता. (वृत्तसंस्था)