विजयाच्या आनंदोत्सवात धोनीच्या मुलीची झोप मोड

By Admin | Updated: March 20, 2016 10:43 IST2016-03-20T10:30:34+5:302016-03-20T10:43:14+5:30

पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या आनंदोत्सवात मात्र धोनीच्या मुलीची झोप मोड झाली. धोनीची पत्नी साक्षीने ही माहिती दिली.

Dhoni's daughter's sleep mode in the celebration of victory | विजयाच्या आनंदोत्सवात धोनीच्या मुलीची झोप मोड

विजयाच्या आनंदोत्सवात धोनीच्या मुलीची झोप मोड

ऑनलाइन लोकमत 

रांची, दि. २० - भारताने शनिवारी रात्री कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच जल्लोष सुरु झाला. कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या रांचीच्या घराबाहेर जमलेल्या चाहत्यांच्या जल्लोषालाही असेच उधाण आले होते. 
 
पण पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या आनंदोत्सवात मात्र धोनीच्या मुलीची झोप मोड झाली. धोनीची पत्नी साक्षीने टि्वटरवरुन ही माहिती दिली. 
 
माझ्या घराबाहेर गाडयांचे हॉर्न वाजवले जातायत, फटाके फोडले जातायत, घोषणा सुरु आहेत. तुम्ही सगळे मिळून माझ्या मुलीला झोपेतून उठवणार आहात असे टि्वट साक्षीने केले. साक्षीनेही टीम इंडियाला टि्वटरवरुन विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. 

Web Title: Dhoni's daughter's sleep mode in the celebration of victory