शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीचा हैदराबादला दणका

By admin | Updated: May 13, 2016 03:27 IST

अडखळत्या सुरुवातीनंतर सॅमसन आणि पंत यांनी मोक्याच्या वेळी केलेल्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर दिल्लीने सध्या फॉर्ममध्ये असलेल्या हैदराबादचा ७ विकेटने दणदणीत पराभव केला.

हैदराबाद : अडखळत्या सुरुवातीनंतर संजू सॅमसन आणि ऋषभ पंत यांनी मोक्याच्या वेळी केलेल्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने सध्या फॉर्ममध्ये असलेल्या सनरायझर्स हैदराबादचा ७ विकेटने दणदणीत पराभव केला. हैदराबादने दिलेल्या १४७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीकरांनी १८.१ षटकांतच ३ फलंदाजांच्या मोबदल्यात १५० धावा केल्या.राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्लीकरांनी यजमान हैदराबादला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. दिल्लीच्या अचूक माऱ्यापुढे हैदराबादला समाधानकारक मजल मारता आली. धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात अडखळती झाली. मयांक अगरवाल (१०) झटपट बाद झाल्यानंतर क्विंटन डी कॉक व करुण नायर यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. दोघेही दहाव्या षटकात अनुक्रमे दुसऱ्या व पाचव्या चेंडूवर बाद झाल्याने दिल्लीचा डाव ३ बाद ७८ धावा असा घसरला. नायरने १७ चेंडंूत २०, तर डी कॉकने ३१ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४४ धावा फटकावल्या.हैदराबाद वर्चस्व मिळवणार असे दिसत होते. परंतु, संजू व ऋषभ यांनी दमदार फटकेबाजी करत दिल्लीला शानदार विजय मिळवून दिला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद ७२ धावांची विजयी भागीदारी केली. संजूने २६ चेंडूंत २ षटकारांसह नाबाद ३४ धावा केल्या. तर ऋषभने २६ चेंडंूत २ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ३९ धावा चोपल्या.तत्पूर्वी, आक्रमक फलंदाज व कर्णधार डेव्हिड वॉर्नरने केलेल्या वेगवान फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने निर्धारित षटकात ८ बाद १४६ धावांची समाधानकारक मजल मारली. वॉर्नरने ३० चेंडंूत ६ चौकार व एका षटकारासह ४६ धावा काढल्या, तर शिखर धवन (३४) व केन विलियम्सन (२७) यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. > सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ८ बाद १४६ धावा (डेव्हिड वॉर्नर ४६, शिखर धवन ३४, केन विलियम्सन २७; अमित मिश्रा २/१९, नॅथन कुल्टर-नाईल २/२५) पराभूत वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स : १८.१ षटकांत ३ बाद १५० धावा (क्विंटन डी कॉक ४४, ऋषभ पंत नाबाद ३९, संजू सॅमसन नाबाद ३४; मोइसेस हेन्रीकेस २/१९)