शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेट स्टेडियमचा उपयोग टेनिस, हॉकीसाठी करा!

By admin | Updated: January 5, 2016 23:56 IST

क्रिकेटला ‘क्लीन’ आणि पारदर्शी करण्यासाठी न्या. आर. एम. लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशींचा अंमल झाल्यास बीसीसीआयला नागपूर, पुणे, राजकोट येथील

नवी दिल्ली : क्रिकेटला ‘क्लीन’ आणि पारदर्शी करण्यासाठी न्या. आर. एम. लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशींचा अंमल झाल्यास बीसीसीआयला नागपूर, पुणे, राजकोट येथील क्रिकेट स्टेडियममध्ये भारतीय हॉकी संघाचे कसोटी सामने; तसेच डेव्हिस चषकाचे टेनिस सामने खेळवावे लागू शकतात.‘संविधान आणि सदस्यांची कामे’ या शीर्षकांतर्गत समितीने जी शिफारस केली, त्यात सध्याच्या स्टेडियमवर भाष्य करण्यात आले आहे. या स्टेडियममध्ये अ‍ॅस्ट्रोटर्फ टाकून टेनिस आणि हॉकीचे आयोजन करण्यात यावे. यामुळे खेळांचा चौफेर विकास होईल. मूळ खेळपट्टीला धक्का लागणार नाही हे ध्यानात घेतले जावे. तथापि, हजारो लोकांची उपस्थिती असलेले सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन मात्र करण्यात येऊ नये, अशी शिफारस आहे. स्टेडियममध्ये अ‍ॅस्ट्रोटर्फ किंवा सिंथेटिक टेनिस कोर्ट तयार करण्याच्या तर्काविषयी बीसीसीआयच्या सीनियर अधिकाऱ्याचे मत जाणून घेतले असता ते म्हणाले, ‘हे शक्य नाही कारण स्टेडियममध्ये एकूण १२ खेळपट्ट्या बनलेल्या असतात.’खेळपट्टीचे नुकसान होऊ नये, अशी एकीकडे सूचना करण्यात आली तर दुसरीकडे मैदानावर हॉकी आणि टेनिस खेळण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात येत आहे. हॉकी मैदानावर सामना सुरू असताना ८० मीटर दूर प्रेक्षक बसल्यास त्यांना सामन्याचा आनंद लुटण्यात अडसर निर्माण होईल, असे हा अधिकारी म्हणाला.मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये २००६ मध्ये पाकविरुद्ध डेव्हिस चषक सामना खेळविण्यात आल्याची आठवण करून देताच हा अधिकारी म्हणाला, ‘क्रिकेट स्टेडियममध्ये टेनिस खेळविण्याची ती पहिली आणि शेवटची घटना होती. प्रेक्षक आणि खेळाडूंमध्ये इतके अंतर असेल तर खेळ कसा लोकप्रिय होईल. या शिफारशी व्यवहारात उपयुक्त ठरतील काय, हा मोठा प्रश्न आहे.’ (वृत्तसंस्था)