शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

फुटबॉलक्रांतीचे पर्व सुरू

By admin | Updated: September 28, 2016 05:15 IST

पुढील वर्षी आॅक्टोबरमध्ये होणारी १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धा भारतात प्रथमच होत आहे. देशाचेच नव्हे, तर संपूर्ण जगताचे लक्ष याकडे असेल. भारतीय फुटबॉलक्षेत्रासाठी

पणजी : पुढील वर्षी आॅक्टोबरमध्ये होणारी १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धा भारतात प्रथमच होत आहे. देशाचेच नव्हे, तर संपूर्ण जगताचे लक्ष याकडे असेल. भारतीय फुटबॉलक्षेत्रासाठी हा सुवर्णक्षण असेल. आता फुटबॉलक्रांतीचे पर्व सुरू झाले आहे, असे मत अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले. यावर फिफा अध्यक्ष जियानी इन्फेन्टिनो यांनीसुद्धा भारतीय फुटबॉल हा ‘स्लिपिंग जायंट’ न राहता ‘पॅशनेट जायंट’ बनला असल्याचे आपल्या विनोदी शैलीतून सांगितले.इन्फेन्टिनो हे प्रथमच भारतीय भूमीवर आले. निमित्त होते आगामी १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या मानचिन्हाच्या (लोगो) अनावरणाचे. येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा समारंभ झाला. या वेळी फिफाचे अध्यक्ष इन्फेन्टिनो, आशियाई फुटबॉल महासंघाचेअध्यक्ष शेख सलमान बिन इब्राहिम, भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल, एआयएफएफचे उपाध्यक्ष श्रीनिवास धेंपे, फिफा आणि एएफसीचे पदाधिकारी उपस्थित होते. इन्फेन्टिनो म्हणाले, की भारतात पहिल्यांदाच आलो आहे. येथील संस्कृती आणि इतिहास याचा चाहता आहे. भारतीय फुटबॉल विकासाकडे वाटचाल करीत आहे. विश्वचषक स्पर्धा ही भारतासाठी खूप मोठी संधी आहे. या स्पर्धेमुळे भारतात फुटबॉल अधिक लोकप्रिय होईल. फुटबॉलचे वातावरण निर्माण होईल. कधी काळी फुटबॉलबाबत ‘स्लिपिंग जायंट’ असलेल्या भारताची या खेळाप्रती प्रचंड आस्था वाढली आहे. (क्रीडा प्रतिनिधी)हा मैलाचा दगड : पटेलभारतीय फुटबॉललाही २५ वर्षे झाली; पण इतिहासातील सर्वात महत्त्वाची स्पर्धा २०१७ मध्ये होत आहे. ही स्पर्धा भारतीय फुटबॉलला ‘बुस्ट’ देणारी आहे. सध्या १६ वर्षांखालील एएफसी चषक सुरू आहे. ही स्पर्धा विश्वचषकाची रंगीत तालीम होती. आता विश्वचषकाच्या आयोजनामुळे भारताला आंतरराष्ट्रीय स्थान मिळेल. ही अभिमानाची बाब आहे. असा आहे लोगो!मोठ्या थाटात विश्वचषकाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. यात उपखंडातील हिंदी महासागराला ठळकपणे दाखवण्यात आले.देशातील समृद्ध संस्कृती, इतिहास, ओळख, अशोकचिन्हाची आठवण करून देणारे पतंग आणि चक्र यांचा मिलाफही यात दिसून येतो.