शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
5
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
6
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
7
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
8
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
9
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
10
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
11
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
12
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
13
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
14
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
15
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
16
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
17
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
18
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
19
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
20
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
Daily Top 2Weekly Top 5

कोलकाताने चाखली विजयाची ‘बर्फी’ !

By admin | Updated: October 13, 2014 06:24 IST

अ‍ॅटलेटिका डी कोलकाता आणि मुंबई सिटी एफसी आयएसएलच्या या पहिल्याच लढतीतील हाफ टाईममध्ये यजमान कोलकाताने १-० अशी आघाडी घेतली.

कोलकाता : इंग्लिश प्रीमिअर लीग, चॅम्पियन्स लीग, ला लीग, युरो लीग या आंतरराष्ट्रीय स्थरावरील क्लब स्पर्धांमध्ये भारताचा ठसा उमटवण्यासाठी सुरू झालेल्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेच्या पहिल्याच लढतीत थरार अनुभवायला मिळाला. प्रीन्स आॅफ कोलकाता सौरव गांगुलीच्या यजमान अ‍ॅटलेटिको डी कोलकाता संघाने अप्रतिम सांघिक खेळ करून विजयाची ‘बर्फी’ चाखली. रणबीर कपूरच्या मुंबई सिटी एफसीच्या ढिसाळ बचावाचा फायदा उचलत फिकरू टेफेरा, फर्नांडिस व अरनाल लिबर्ट यांनी गोल करून कोलकाताला ३-० असा विजय मिळवून दिला.अ‍ॅटलेटिका डी कोलकाता आणि मुंबई सिटी एफसी आयएसएलच्या या पहिल्याच लढतीतील हाफ टाईममध्ये यजमान कोलकाताने १-० अशी आघाडी घेतली. ७० हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या लढतीत सुरुवातीपासून मुंबईने आक्रमक खेळ करण्यावर भर दिला. १९व्या मिनिटाला मुंबईच्या राजू गायकवाड आणि कोलकाताच्या एफ टेरेफा याला २५व्या मिनिटाला पिवळे कार्ड दाखविण्यात आले. गोल करण्याच्या दोन संधी हुकल्यानंतर २७व्या मिनिटाला कोलकाता वासिंना जल्लोषाची संधी मिळाली. फिकरू टेरेफाने मिळालेल्या पासचा अचूक अंदाज बांधून कोलकातासाठी पहिला गोल केला. यावेळी मात्र मुंबईचा गोलकीपर पॉल याने पुढे येऊन गोल अडविण्याचा केलेला प्रयत्न फसला. २९ व ३२ व्या मिनिटाला अनुक्रमे जॅन स्टोहांज व ओफेत्सें नाटो या मुंबईच्या दोघांना यलो कार्ड दाखविण्यात आले. पहिल्या हाफमध्ये कोलकाताकडे १-० अशी आघाडी होती.दुसऱ्या हाफमध्ये नव्या रणनितीने मैदानावर मुंंबई संघ उतरला. टिएगो रिबेरो याला बाहेर करून अ‍ॅण्ड्रे मोरिज्झ याला मैदानावर आणून मुंबईने आक्रमण वाढवला, परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. मुंबईच्या खेळाडूंमध्ये समन्वयाचा अभाव दिसत होता. त्याचाच फायदा उचलून कोलकाताने ६९व्या मिनिटाला संधी साधली. बोर्जा फर्नांडिस याला मुंबईचा ढिसाळ बचाव फोडण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले नाही आणि त्याने २५ यार्डावरून कोलकातासाठी दुसरा गोल केला. त्यानंतर मुंबईची हवाच निघाली आणि संपूर्ण सामन्यात यजमानांचेच वर्चस्व दिसले. ८७व्या मिनिटाला लुइस गार्सिया याला रिप्लेस करून अरनाल लिबर्ट याला मैदानावर उतरवले. अतिरिक्त वेळेत याच अरनालने कोलकातासाठी तिसरा गोल करून विजयावर शिक्कामोर्तब केला.