शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
5
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
6
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
7
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
8
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
9
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
10
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
11
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
12
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
13
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
14
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
15
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
16
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
17
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
18
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
19
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
20
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
Daily Top 2Weekly Top 5

आनंदित रेड्डीने मारली बाजी

By admin | Updated: October 10, 2016 04:19 IST

हैदराबादचा उगवता तारा आनंदित रेड्ढीने अनपेक्षित कामगिरी करीत युरो जेके १६ रेसिंगमध्ये बाजी मारली. तिसऱ्या फेरीअखेर त्याचे ७६ गुण झाले असून, तो आता

विश्वास चरणकर / कोईम्बतूरहैदराबादचा उगवता तारा आनंदित रेड्ढीने अनपेक्षित कामगिरी करीत युरो जेके १६ रेसिंगमध्ये बाजी मारली. तिसऱ्या फेरीअखेर त्याचे ७६ गुण झाले असून, तो आता अनंत षण्मुगमसह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. एलजीबी फॉर्म्युला ४ शर्यतीत चेन्नईच्या विष्णू प्रसादने दोन्ही शर्यती जिंकत आपले अव्वलस्थान कायम राखले आहे. या वेळी आंतरराष्ट्रीय स्टंटमास्टर टेरी ग्रँट यांनी केलेल्या चारचाकी गाड्यांच्या ‘स्टंट शो’ने प्रेक्षकांची मने जिंकली.तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील केरी मोटर स्पीडवे ट्रॅकवर रविवारी जे के राष्ट्रीय रेसिंग चॅम्पियनशिप २0१६चा तिसरा राउंड पार पडला. रेड्डीने युरो जेके १६ गटात ३८ गुणांची कमाई करताना संयुक्त अव्वल स्थान पटकावले. बंगळुरूच्या अनंतला या शर्यतीतून २८ गुण पदरी पडले. शनिवारच्या शर्यतीत चमकदार कामगिरी करणारा मुंबईचा नयन चॅटर्जी एकूण ७३ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. या यादीत कोल्हापूरचा ध्रुव मोहिते चौथ्या स्थानावर आहे. एलजीबी फॉर्म्युला ४ शर्यतीत चेन्नईच्या विष्णू प्रसादने दोन्ही शर्यतींत प्रथम स्थान मिळवले असले तरी त्याला रविवारी त्याच्याच मेको स्पोर्ट्सच्या राघुल रंगास्वामीने कडवी झुंज दिली. 0.0२३ सेकंदाने तो विष्णूपेक्षा मागे पडला. राघुल एकूण ५१ गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पहिल्या स्थानावरील विष्णूचे ६६ गुण असून, सरन विक्रम तिसऱ्या तर रोहित खन्ना चौथ्या स्थानावर आहे.जेके टुरींग कार गटात बेंगलोरच्या आशिष रंगास्वामीने आपले सिंहासन अबाधित राखले आहे. त्याचे एकूण १२0 गुण झाले आहेत.