शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

आगामी सत्रात उत्कृष्ट कामगिरीचे लक्ष्य : इरफान

By admin | Updated: January 14, 2015 02:26 IST

आगामी रणजी सत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याचे लक्ष्य आहे; त्यात मी नक्कीच यशस्वी होईल, असे मत सध्या टीम इंडियातून बाहेर असलेला वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने व्यक्त केले आहे़

नवी दिल्ली : आगामी रणजी सत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याचे लक्ष्य आहे; त्यात मी नक्कीच यशस्वी होईल, असे मत सध्या टीम इंडियातून बाहेर असलेला वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने व्यक्त केले आहे़ नोव्हेंबर २०१२ ते जानेवारी २०१५ पर्यंत इरफानला केवळ तीनच प्रथम श्रेणी सामने खेळता आले़ कारण दुखापतीमुळे तो संघातून जास्त वेळ बाहेरच होता़ इरफान पुढे म्हणाला, की पुन्हा एकदा आता कमबॅक करीत आहे, याचा आनंद आहे़ आता आगामी सत्रात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करण्याची इच्छा आहे़ त्यासाठी गोलंदाज आणि फलंदाजीवर विशेष मेहनत घेतली आहे़ यादरम्यान मी आपल्या फिटनेसवरही मेहनत घेतली आहे़ याच बळावर आगामी सत्रात चांगली कामगिरी करण्याचा विश्वास आहे़२०१४ च्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) खेळताना इरफानच्या खांद्याला दुखापत झाली होती़ त्यामुळे त्याला केवळ १० सामनेच खेळता आले होते़ यानंतर चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेदरम्यान पुन्हा त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली, त्यानंतर जवळपास ६ महिने तो क्रिकेटपासून दूर राहिला होता़दरम्यान, इरफान पठाणने बडोदा संघाला सोडचिठ्ठी देत असल्याचा इन्कार केला आहे़ तो म्हणाला, बडोदा क्रिकेट संघटनेने (बीसीए) मला फिटनेस सिद्ध करण्यास सांगितले होते़ क्लबच्या दोन-तीन सामन्यांत मी खेळून फिटनेस सिद्ध करू शकतो़ संघटनेतील काही अधिकारी माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत़ ड्रेसिंग रूममधील काही गोष्ट जाणीवपूर्वक सार्वजनिक केल्या जात आहेत़ मी संघ सोडण्याची कधीही भाषा केली नाही, असेही तो म्हणाला़ (वृत्तसंस्था)