शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कश्यपची दुखापतीमुळे माघार

By admin | Updated: October 23, 2015 01:38 IST

रंगतदार झालेल्या सामन्यातील अंतिम सेटमध्ये दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्याने भारताच्या पारुपल्ली कश्यपचे फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

पॅरीस : रंगतदार झालेल्या सामन्यातील अंतिम सेटमध्ये दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्याने भारताच्या पारुपल्ली कश्यपचे फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. अन्य एका लढतीत अजय जयरामने झुंजार खेळ करताना विजयी आगेकूच केली.राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता कश्यपचा ब्रिटनच्या राजीव ओसेफ विरुध्द रंगतदार सामना झाला. राजीवने पहिला सेट जिंकून आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये कश्यपने बाजी मारत सामना बरोबरीत आणला. यावेळी कश्यप बाजी मारणार अशी शक्यता होती. मात्र, तिसऱ्या सेट दरम्यान कश्यपला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. यावेळी राजीव ४-२ असा आघाडीवर होता.कश्यपच्या माघारीमुळे राजीवला ४४ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात २१-११, १३-२१, ४-२ असे विजयी घोषित करण्यात आले. दुसऱ्या बाजूला पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या भारताच्या अजय जयरामने झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना डेन्मार्कच्या हैंस क्रिस्टीयनचा २१-१८, १८-२१, २१-१८ असा पाडाव करुन दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.त्याचवेळी बुधवारी महिला गटात भारताला मोठा धक्का बसला. डेन्मार्क ओपनचे उपविजेतेपद पटकावून संभाव्य विजेत्यांमध्ये स्थान मिळवलेल्या भारताच्या पी. व्ही. सिंधूचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. चीनच्या चौथ्या मानांकित वांग शिजियान विरुध्द सिंधूला १०-२१, ११-२१ असा निराशाजनक पराभव पत्करावा लागला.