शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

विंडीजला नमवून आॅस्ट्रेलिया फायनलमध्ये

By admin | Updated: June 22, 2016 18:18 IST

विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाने ओव्हल मैदानावर वेस्ट इंडिजचा सातव्या सामन्यात सहा गड्यांनी पराभव करीत तिरंगी वन डे मालिकेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

ऑनलाइन लोकमत

ब्रिजटाऊन, दि. 22- विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाने ओव्हल मैदानावर वेस्ट इंडिजचा सातव्या सामन्यात सहा गड्यांनी पराभव करीत तिरंगी वन डे मालिकेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मर्लोन सॅम्युअल्सचे पहिले शतक आणि दिनेश रामदिनसोबतच्या विक्रमी भागीदारीच्या बळावर विंडीजने ८ बाद २८२ धावा उभारल्या. सॅम्युअल्सने अखेरच्या चेंडूवर बाद होण्याआधी १३४ चेंडूत १४ चौकार आणि दोन षटकारांसह १२५ तर रामदिनने ९१ धावा ठोकल्या. या दोघांंनी चौथ्या गड्यासाठी १९२ धावांची भागीदारी केली.आॅस्ट्रेलियाकडून कर्णधार स्टीव्ह स्मिथ ७८ आणि मिशेल मार्शने नाबाद ७९ धावांचे योगदान दिले. ग्लेन मॅक्सवेलने २६ चेंडूत नाबाद ४६ धावा ठोकताच ४८.४ षटकांत चार बाद २८३ धावा करणाऱ्या आॅस्ट्रेलियाचा विजय साकार झाला. स्मिथ- मार्श यांनी चौथ्या गड्यासाठी १२२ धावा ठोकल्या. स्मिथ ४२ व्या षटकांत बाद होताच विंडीजला सामना जिंकण्याची आशा होती पण मॅक्सवेलने त्यांच्या आशेवर पाणी फेरले.त्याआधी सॅम्युअल्सने दहावे वन डे शतक ठोकून विंडीजला दमदार मजल गाठून दिली. मागच्या सामन्यात आॅस्ट्रेलियावरील विजयात त्याने ९२ धावांचे योगदान दिले होते. विंडीजची सुरुवात खराब झाली. ३१ धावांत तीन गडी बाद झाले होते. सॅम्युअल्स-रामदिन यांनी १९२ धावा ठोकून आॅस्ट्रेलियाच्या तोंडचे पाणी पळविले होते. या खेळीदरम्यान सॅम्युअल्सने वन डेत पाच हजारतर रामदिनने दोन हजार धावांचा टप्पा गाठला. याआधी क्लाईव्ह लॉईड-रोहण कन्हाय यांनी लॉर्डस्वर पहिल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ४१ वर्षांआधी १४९ धावांची भागीदारी केली होती. सॅम्युअल्स-रामदिन यांनी तो विक्रम मोडीत काढला.