शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अंजू बॉबी जॉर्जने दिला अध्यक्षपदाचा राजीनामा

By admin | Updated: June 23, 2016 01:50 IST

विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकणारी भारताची एकमेव महिला अ‍ॅथलिट अंजू बॉबी जॉर्ज हिने केरळ राज्य क्रीडा परिषदेच्या अध्यक्षपदाचा बुधवारी राजीनामा दिला.

तिरुवनंतपुरम : विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकणारी भारताची एकमेव महिला अ‍ॅथलिट अंजू बॉबी जॉर्ज हिने केरळ राज्य क्रीडा परिषदेच्या अध्यक्षपदाचा बुधवारी राजीनामा दिला. अंजू बॉबी जॉर्जने येथे एका पत्रकार परिषदेत केरळ राज्य क्रीडा परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. तिच्याबरोबरच परिषदेतील १३ सदस्यांनीही राजीनामा दिला. केरळचे क्रीडामंत्री ई. पी. जयराजन यांचा अपमान केल्याचा आरोप अंजूवर आहे. त्याचप्रमाणे जयराजन यांनी अंजूवर अध्यक्षपदाच्या रूपात आर्थिक गैरव्यवहार करण्याचा कथित आरोप केला. याविषयी अंजूने म्हटले, ‘खेळ एखादी पार्टी अथवा राजकीय व्याप्तीच्या बाहेर आहे. मला क्रीडा परिषदेचा अध्यक्ष बनण्याची संधी मिळाली होती, याचा मला आनंद होता; परंतु दुर्दैवाने जे काम व्हायला हवे होते ते झाले नाही. त्यामुळे मी आपल्या पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला.’ अंजूने ते खेळाला मारू शकतात; परंतु खेळाडूंना हरवू शकत नसल्याचे म्हटले.अंजूला ओमन चंडी यांच्या नेतृत्वाखालील याआधीच्या यूडीएफ सरकारने क्रीडा परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्त केले होते. क्रीडा परिषदेच्या अन्य सदस्यांत भारतीय राष्ट्रीय हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेश, व्हॉलीबॉलपटू टॉम जोसेफ आणि अ‍ॅथलिट प्रीजा श्रीधरन यांचा समावेश आहे.जयराजन यांच्या आरोपानंतर भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघ आणि भारतीय आॅलिम्पिक संघटनादेखील अंजू जॉर्जच्या बचावासाठी पुढे आले होते.आॅलिम्पिक संघटना आणि अ‍ॅथलेटिक्स महासंघाने अंजूविरुद्ध असे आरोप लावणे अनावश्यक आणि दु:खद असल्याचे म्हटले होते. आयओएने मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांना ते अंजू बॉबीचे समर्थन करून त्यांना मदत करण्याची विनंती केली होती.(वृत्तसंस्था)