आनंदचा दारुण पराभव

By Admin | Updated: November 1, 2015 02:55 IST2015-11-01T02:55:04+5:302015-11-01T02:55:04+5:30

गत विश्व चॅम्पियन विश्वनाथन आनंद याला बिलबाओ मास्टर्स फायनल बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत हॉलंडचा ग्रॅण्डमास्टर अनीश गिरी याच्याकडून दारुण पराभव पत्करावा लागला.

Anand's drunken defeat | आनंदचा दारुण पराभव

आनंदचा दारुण पराभव

बिलबाओ : गत विश्व चॅम्पियन विश्वनाथन आनंद याला बिलबाओ मास्टर्स फायनल बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत हॉलंडचा ग्रॅण्डमास्टर अनीश गिरी याच्याकडून दारुण पराभव पत्करावा लागला.
तीन लढती बरोबरीत सोडविल्यानंतर आनंदचा चौथ्या फेरीत गिरीकडून हा पहिला पराभव आहे. या विजयानंतर गिरीचे सहा गुण झाले. तो अमेरिकेचा वेस्ली सोच्या बरोबरीने अव्वल स्थानावर आहे. या स्पर्धेत विजयी खेळाडूला तीन आणि पराभूत खेळाडूला शून्य गुण दिला जातो. ड्रॉसाठी एक गुण मिळतो. आनंद तीन गुणांसह संयुक्त तिसऱ्या स्थानावर आहे. स्पर्धेत दोन फेऱ्या शिल्लक असून, महत्त्वपूर्ण लढतीत आनंद वेस्लीविरुद्ध पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळेल.(वृत्तसंस्था)

Web Title: Anand's drunken defeat