शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
4
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
5
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
6
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
7
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
8
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
9
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
10
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
11
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
12
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
13
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
15
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
16
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
17
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
18
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
19
जगातील टॉप-१०० मधून भारतीय कंपन्या हद्दपार; रिलायन्सही या स्थानावर घसरली...
20
मंदिरांमधील सोने सरकार विकणार आहे ? चर्चा आणि अफवांना सरकारने दिला पूर्णविराम 
Daily Top 2Weekly Top 5

Wrestlers Stage Protest: 5-6 महिला कुस्तीपटूंवर अत्याचार केल्याचा पुरावा आमच्याकडे आहे; बजरंग पुनियाचा खळबळजनक आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 16:49 IST

Wrestlers Stage Protest: भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत.

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतरमंतरवर कालपासून भारतीय कुस्ती महासंघाविरोधात (WFI) ऑलिम्पियन खेळाडू आंदोलन करत आहेत. आज आंदोलनाचा दुसरा दिवस असून अद्याप भारतीय कुस्तीपटू आंदोलनावर ठाम आहेत. या कुस्तीपटूंमध्ये ऑलिम्पियन बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि सरिता मोर यांच्यासह अनेक खेळाडूंचा समावेश आहे. महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने प्रशिक्षकावर गंभीर आरोप केले आहेत. ती म्हणाली की, "प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे." लक्षणीय बाब म्हणजे ब्रिजभूषण सिंह भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. 

दरम्यान, पैलवान बजरंग पुनिया याने सरकारला इशारा देत आंदोलनावर ठाम राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्याने आज एक मोठे विधान करताना म्हटले, "जर आम्ही आमच्या देशासाठी लढू शकतो तर आम्ही आमच्या हक्कांसाठी देखील लढू शकतो." अशा शब्दांत ऑलिम्पियन कुस्तीपटू बजरंग पुनियाने दिल्लीच्या जंतरमंतरवरून इशारा दिला आहे. तसेच चॅम्पियन कुस्तीपटू आणि भाजप नेत्या बबिता फोगाट यांनी देखील आंदोलनस्थळी हजेरी लावली. सरकार त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. आंदोलकांचे प्रश्न आज सुटावेत यासाठी मी प्रयत्न करेन, असा विश्वास बबिता फोगाट यांनी आंदोलक खेळाडूंना दिला. 

महिला पैलवानांवर अत्याचार केल्याचा पुरावा आहे - पुनिया 
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीपटू बजरंग पुनियाने गंभीर आरोप केले आहेत. "आमच्यासोबत 5-6 महिला कुस्तीपटू आहेत ज्यांनी या अत्याचारांचा सामना केला आहे आणि आमच्याकडे ते सिद्ध करण्यासाठी पुरावे देखील आहेत", असा इशारा ऑलिम्पियन कुस्तीपटू बजरंग पुनियाने दिला आहे. तसेच आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून सरकारकडून आम्हाला कोणताही समाधानकारक प्रतिसाद मिळालेला नाही. ब्रिजभूषण सिंग राजीनामा देतील आणि तुरुंगात जातील याची आम्हाला खात्री आहे. आम्ही नक्कीच गुन्हा दाखल करू, असे महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने सांगितले. 



विनेश फोगाटचे गंभीर आरोप 
विनेश फोगाटने गंभीर आरोप करताना म्हटवे, "ते (युनियन) आमच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करतात आणि आमचा छळ करतात. ते आमचे शोषण करत आहेत. आम्ही ऑलिम्पिकला गेलो तेव्हा आमच्याकडे फिजिओ किंवा प्रशिक्षक नव्हता. जंतरमंतरच्या कुस्तीपटूंना हे सांगायचे आहे तेव्हापासून आम्ही आमचा आवाज उठवला आहे, पण आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत."

आंदोलन करावे लागते ही मजबुरी - फोगाट 
"आमची मजबुरी आहे की इथे येऊन ठिय्या मांडावा लागतो. आम्ही आपापसात चर्चा केली, त्यानंतरच आम्ही त्याबाबत निर्णय घेतला, आम्हाला दु:ख होत असताना ही योजना आखली गेली. सर्व पैलवानांना त्रास होत आहे", असे महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने अधिक सांगितले. भारतीय कुस्ती महासंघाचे अधिकारी आंदोलनाला बसलेल्या खेळाडूंना भेटण्यासाठी जंतरमंतरवर पोहोचले आहेत. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नसल्याचे बजरंग पुनियाने सांगितले. त्यांना कोणाच्या समस्या आहेत असे विचारले असता ते म्हणाले की, फेडरेशन आमच्यासाठी मोठी समस्या निर्माण करते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :Wrestlingकुस्तीCrime Newsगुन्हेगारीVinesh Phogatविनेश फोगटBabita Kumari Phogatबबिता फोगाटsexual harassmentलैंगिक छळ