शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

उरण विधानसभा मतदारसंघात अखेर परिवर्तनाची लाट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 12:39 AM

अटीतटीचा सामना; तिरंगी लढतीत महेश बालदी यांची बाजी

- मुधकर ठाकूर उरण : महायुतीला आव्हान देणाऱ्या भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी अखेर सेनेचे मनोहर भोईर यांना पराभवाची धूळ चारत उरण विधानसभा मतदारसंघात विजयाची पताका फडकावली. अत्यंत चुरशीच्या तिरंगी लढतीकडे तमाम राज्यातील राजकीय पक्षांच्या नेत्यांसह उरणकरांचेही लक्ष लागून राहिले होते. सेनेचे आमदार मनोहर भोईर यांच्या कारभाराला कंटाळून अखेर सूज्ञ मतदारांनीच भोईर यांना पराभवाचा धक्का देऊन मतदारसंघात परिवर्तन घडवले.

भविष्यात देशाची दुसरी आर्थिक राजधानी म्हणून उरण उदयास येत आहे. त्यामुळे या मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षात जोरदार लढाई सुरू होती. उरणमध्ये तिन्ही उमेदवारांमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी घमासान सुरू होते. परस्परांविरोधात दररोजच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात होत्या. जातीपातीच्या हीन प्रचारामुळे प्रचाराची पातळी अत्यंत खालावली होती. ‘मते मागतो आहे, मुलगी नव्हे’ या बालदी यांच्या वक्तव्यांविरोधात तर शेकाप, सेनेने रान उठविले होते.

जनता, कार्यकर्त्यांना वेळ न देऊ शकणाºया आणि कार्यकर्त्यांची कदर नसलेल्या व जनतेच्या विकासकामांऐवजी ठेकेदारीच्या कामातच अधिक रस दाखविणाºया भोईर यांच्याविरोधात काही नाराज शिवसैनिकच उभे ठाकले होते. पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळात त्यांनी हितचिंतकांना जवळ केले होते, तर प्रामाणिक कार्यकर्त्यांना त्यांनी दूर केले. मतदारसंघात फारशी लोकोपयोगी कामे केली नसल्याने अखेर प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाचारण करण्याची पाळी आली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांची प्रचारसभाही भोईर यांना पराभवापासून वाचवू शकली नाही.

तीच स्थिती शेकाप उमेदवार विवेक पाटील यांची झाली आहे. २०१४ च्या पराभवानंतर अनेक निष्ठावंत, प्रामाणिक कार्यकर्ते दुरावले गेले आहेत. त्यांना पुन्हा पक्षात आणता आले नाही. प्रचारादरम्यान अनेक काँग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते महाआघाडीचा धर्म विसरून विरोधकांना मदत करताना दिसत होते. प्रचारातही ताळमेळ लागत नव्हता. अखेर मतदारांनी विवेक पाटील यांच्याविरोधातील नाराजी मतपेटीद्वारे व्यक्त केल्याचे दिसून येत आहे.

स्वबळावर घुमवला शिटीचा आवाज

भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी उरण मतदारसंघात केंद्र, राज्य शासनाच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मतदारांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी ठरले. पक्षातून निष्कासित करण्यात आले असले तरी त्यांनी प्रचारपत्रके, फ्लेक्सवर भाजप नेत्यांचे फोटो लावले. यासाठी भाजप नेत्यांचा त्यांना छुपा पाठिंबा मिळत होता. त्याशिवाय जाहीर सभा, कॉर्नर सभांचे शिस्तबद्ध नियोजन आणि तरुण कार्यकर्त्यांची फौज यांच्या भरघोस पाठिंब्यावर महेश बालदी यांनी अखेर बाजी मारली. विशेष म्हणजे, कोणताही नेता हाताशी नसतानाही त्यांनी स्वबळावर उरणमध्ये शिटीचा आवाज घुमवला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019uran-acउरण