शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीला ठरविले अदखलपात्र गुन्हा

By admin | Updated: July 7, 2017 06:38 IST

कोपरखैरणेमध्ये अनिल मोबाइल या दुकानामध्ये ८ जूनला रात्री चोरी झाली. चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून आतमधील रोख रक्कम व २२ मोबाइल

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोपरखैरणेमध्ये अनिल मोबाइल या दुकानामध्ये ८ जूनला रात्री चोरी झाली. चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून आतमधील रोख रक्कम व २२ मोबाइल चोरून नेले. दुकान मालकाने चोरट्याचे सीसीटीव्हीमधील चित्रण, नाव व पत्ता दिला आहे. पण पोलिसांनी एक महिन्यात गुन्हाही दाखल केला नाही व आरोपीस अटकही केलेली नाही. येथील सेक्टर ७ मध्ये शांताराम दानवले यांचे अनिल टेलर्स व अनिल मोबाइल नावाने दोन छोटी दुकाने आहेत. ८ जूनला रात्री दुकान बंद करून ते घरी गेले असताना चोरट्यांनी शटर तोडून आतमधील २३ हजार रूपये रोख रक्कम व दुरूस्तीसाठी आलेले २२ मोबाइल चोरून नेले आहेत. या प्रकरणी दानवले यांनी ९ जूनला कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करणे आवश्यक होते. परंतु प्रत्यक्षात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. दुसऱ्या दिवशी दुकानातील सीसीटीव्हीमधील चित्रण तपासले असता कोपरखैरणे परिसरामध्येच राहणाऱ्या सूरज नावाच्या तरुणाने चोरी केल्याचे निदर्शनास आले. हा तरुण कोठे राहतो याचीही माहिती घेवून पोलिसांना देण्यात आली आहे. चोरीची घटना घडून जवळपास एक महिना पूर्ण होत आला आहे. चोरी कोणी केली याची माहिती, पत्ता पोलिसांना देण्यात आला आहे. चोरट्याचे छायाचित्र कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट दिसत आहे. यानंतरही पोलिसांनी अद्याप घरफोडीचा गुन्हा दाखल केला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आरोपीची ओळख पटल्यानंतर तत्काळ त्याला अटक केली असती तर त्याने चोरी केलेली २३ हजार रुपयांची रोकड व दुकानामध्ये दुरुस्तीसाठी आलेले २२ मोबाइल तत्काळ हस्तगत करण्यात यश आले असते. पोलीस आरोपीला पकडण्यात का दुर्लक्ष करत आहेत याविषयी दुकानमालक शांताराम दानवले यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.