शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
2
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
3
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
4
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
5
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
6
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
7
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
8
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
9
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
10
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
11
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
12
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
13
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
14
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
15
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
16
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
17
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
18
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
19
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
20
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवसेनेची साथ मनसेच्या पथ्यावर, मतदान वाढले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 12:33 IST

विधानसभा गत निवडणुकीच्या तुलनेत मनसेच्या मतांचा टक्का वाढल्याचे दिसत आहे.

- सूर्यकांत वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई: महापालिका निवडणुकीत यंदा प्रथमच उद्धवसेना व मनसे एकत्र निवडणूक लढले. त्यामध्ये उद्धवसेनेचे दोन, तर मनसेचा १ उमेदवार निवडून आला आहे. उर्वरितांपैकी अनेकजण पराभूत होऊनही दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर आहेत. विधानसभा गत निवडणुकीच्या तुलनेत मनसेच्या मतांचा टक्का वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे नवी मुंबईत मनसे व उद्धवसेनेच्या युतीला किरकोळ फायदा झाल्याचे दिसते आहे.

सत्ताधारी भाजप व शिंदेसेनेविरोधात दंड थोपटत दोन ठाकरे बंधूंनी महापालिका निवडणुकीत टाळी दिली होती. त्यानुसार नवी मुंबईत युतीतून
मनसेने २५, तर उद्धवसेनेने ५६ जागा लढवल्या होत्या. त्यात काही अपक्षांनाही युतीने साथ दिली. या निवडणुकीच्या निकालाअंती नवी मुंबईत युतीला किमान फायदा झाल्याचे दिसले. मनसेचे वेगवेगळ्या मुद्द्यांवरून होणाऱ्या आंदोलनातून टिकून असलेले अस्तित्व, तर जुन्या शिवसेनेला व उद्धव ठाकरेंना मानणारा शहरातील घटक, त्यांनी या युतीला मतांद्वारे साथ दिली.

महापालिका निवडणुकीत मनसेने खाते खोलले असून अभिजीत देसाई विजयी झाले आहेत.

युतीच्या उमेदवारांना २ लाख ६४ हजार मते मिळाली आहेत. त्यातून उद्धवसेनेचे दोन, तर मनसेचा एक उमेदवार निवडून आला आहे. त्याशिवाय ९ ठिकाणी उद्धवसेना व १ ठिकाणी मनसे दुसऱ्या स्थानावर आहे. मनसेचे विजयी उमेदवार अभिजित देसाई यांनी शनिवारी रात्री अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

विधानसभेपेक्षा पालिकेत ४२ मतांची झाली वाढ
विधानसभा निवडणुकीत मनसेचे बेलापूरमधून गजानन काळे, तर ऐरोलीतून नीलेश बाणखेले मैदानात उतरले होते. त्यावेळी काळेंना ११,९८०, तर बाणखेलेंना ४ हजार २३३ मते मिळाली होती. महापालिका निवडणुकीत मात्र मतांचा टक्का वाढल्याचे दिसून आले.
बेलापूरमधून मनसेच्या 3 उमेदवारांना ५३ हजार, तर ऐरोलीतल्या ६ उमेदवारांना १५ हजार मते मिळाली आहेत. मनसेचा ऐरोलीत अद्यापही बेलापूर इतका बोलबाला नसल्याने कमीच उमेदवार उतरवले होते. त्यात विधानसभा लढवलेल्या नीलेश बाणखेले यांना ३,८४९ मते मिळावी आहेत. ठाकरे बंधू एकत्र आल्याने मनसेच्या मते वाढली आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav Sena Alliance Boosts MNS; Increased Voting Percentage Observed

Web Summary : Uddhav Sena and MNS alliance saw increased votes in Navi Mumbai municipal elections. MNS won one seat, Uddhav Sena two. Overall, the alliance benefited slightly, increasing MNS's vote share compared to previous assembly elections.
टॅग्स :MNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNavi Mumbai Municipal Corporation Electionनवी मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६