शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अपघाताच्या ठिकाणी प्रवाशांचा माशांवर ताव

By admin | Updated: July 6, 2017 06:47 IST

भीषण अपघाताच्या ठिकाणी घटनेचे गांभीर्य विसरून प्रवाशांनी ट्रकमधून पडलेल्या माशांवर ताव मारल्याचे चित्र मंगळवारी सकाळी

नवी मुंबई : भीषण अपघाताच्या ठिकाणी घटनेचे गांभीर्य विसरून प्रवाशांनी ट्रकमधून पडलेल्या माशांवर ताव मारल्याचे चित्र मंगळवारी सकाळी नेरुळमध्ये पहायला मिळाले. पोलिसांनी हटकून देखील अनेक जण रस्त्यावर पडलेले मासे उचलून पिशवीत भरण्याचा प्रयत्न करत होते. माणुसकीला काळिमा फासणारे हे दृश्य दर्शवणारा व्हिडीओ बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांच्या प्रवृत्तीचे उघड दर्शन घडले आहे.मंगळवारी सकाळी सायन-पनवेल मार्गावर उरणफाटा येथे घडलेल्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दोघे जण जखमी झाले आहेत. रस्त्याच्या डांबरीकरणात झालेल्या त्रुटीमुळे रस्ता गुळगुळीत होवून भरधाव वाहने त्याठिकाणी घसरत आहेत. याच प्रकारात समोरील ट्रक घसरून कठड्याला धडकला. या वेळी पाठीमागून येणारी इतर वाहने त्या ट्रकला धडकून हा भीषण अपघात झाला. या वेळी मृतदेह व जखमी रस्त्यावर पडलेल्या ठिकाणापासून १०० ते १५० मीटर अंतरावर एक माशांचा टेंपो देखील पलटी झालेला होता. घटनेची माहिती मिळताच नेरुळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह व जखमींना रुग्णालयात नेले. नेमके त्याच वेळी घटनास्थळावरुन जाणारे इतर प्रवासी रस्त्यावर पडलेले मासे उचलण्यात व्यस्त होते. चार ते पाच वाहने एकमेकांवर आदळून रस्त्यावर आडवी झालेली असल्यामुळे हा रस्ता रहदारीसाठी बंद करण्यात आलेला होता. त्यामुळे विरुध्द दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहनचालक, प्रवासी देखील थांबून रस्त्यावरील मासे जमा करताना दिसत होते. तर पुलालगतची झोपडपट्टी व परिसरातील काहींनी सोबत ड्रम आणून मासे जमा करत होते. त्यापैकी एकानेही दुर्घटनाग्रस्त व पोलीस यांच्या मदतीसाठी धाव घेतली नाही. प्रवाशांनी त्यांच्या बेशिस्तीचे दर्शन घडवल्याचा संताप व्यक्त होत आहे.