शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

गाडय़ा गेल्या, पैसे गेले, हाती राहिली कागदपत्रे

By admin | Updated: November 28, 2014 00:23 IST

सेकंड हॅन्ड चारचाकी वाहनांची विक्री करणा:या नेरूळ येथील एका भामटय़ाने विक्रीसाठी दिलेल्या वाहनांसहित पोबारा केला.

कामोठे : सेकंड हॅन्ड चारचाकी वाहनांची विक्री करणा:या नेरूळ येथील एका भामटय़ाने विक्रीसाठी दिलेल्या वाहनांसहित पोबारा केला. त्याच्याविरोधत सुमारे 26 तक्रारी आल्या असून एनआरआय पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलीस आरोपीचा शोध घेत  आहेत. त्याच्या पत्नीला मंगळवारी अटक करण्यात आली. या प्रकारामुळे गाडी मालकांच्या तोंडचे मात्र पाणी पळाले आहे. गाडी गेली, पैसे गेले, हाती राहिली कागदपत्रे अशी त्यांची स्थिती झाली आहे.
नवी मुंबई आणि पनवेल परिसरात सेकंड हॅन्ड गाडय़ांच्या विक्रीसाठी अनेक दलालांनी दुकाने थाटली आहेत. वसाहतीत रस्त्यावर वाहने उभी करून ‘फॉर सेल’ असे पोस्टर लावून मार्केटिंग केले जाते. मालकांकडून कमी किमतीत गाडय़ा घेऊन त्या जास्त दराने विकणो हा त्यांचा व्यवसाय आहे. सीवूड येथील सेक्टर न्यू/5क् मध्ये माऊल सोसायटीत गाळा क्रमांक 6 येथे नाझीर याने अशाच प्रकारे व्यवसाय थाटला होता. हा गाळा त्याने भाडे तत्त्वावर घेतला होता. ग्राहकांना गळ घालण्यात तो पटाईत असल्याने अनेकांनी आपली वाहने विक्रीकरिता नाझीरकडे दिली होती. ‘थोडे दिवस गाडी इथे ठेवा. चांगली किंमत मिळवून देतो,’ असे तो मालकांना सांगत असे. त्यामुळे अनेक गाडीमालकांनी डोळे झाकून वाहने त्याच्याकडे दिली होती. नाझीर टप्प्या टप्प्याने ही वाहने दुसरीकडे हलवत असे. तुमची गाडी विकली आहे. पुढच्या आठवडय़ात येऊन पैसे घेऊन जा, असे सांगत तो हेलपाटे मारायला लावत असे. काहींना तर तो, ‘तुमच्या कारचा माङयाकडून अपघात झाला आहे. पण काळजी करू नका. पुढच्या महिन्यात पहिल्या आठवडय़ात या आणि पैसे घेऊन जा,’ असे सांगून तो समजूत काढत असे. त्याने अनेकांना दिवाळीनंतर पैसे घेण्यासाठी बोलावले होते, मात्र एके दिवशी एकही वाहन न ठेवता त्याने पोबारा केला. रोज तिथे फे:या घालून कंटाळलेल्या कारमालकांनी अखेर एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या. नाझीर आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर) 
 
पसार झालेल्या नाझीरचा o्रीवर्धन येथील मूळगावी शोध घेण्यात आला, पण तो सापडला नाही. पत्नीच्या चौकशीतून या प्रकरणाचे धागेदोरे हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरोपींनी सुमारे एक कोटी रुपयांच्या वाहनांचा अपहार केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याची पत्नी या ‘टोटल कार पॉइंट’मध्ये कॅशिअर असल्याने एनआरआय पोलिसांनी तिला मंगळवारी अटक केली. तिला पोलीस कोठडी ठोठावली आहे. या प्रकरणचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बेंद्रे करीत आहेत.
 
कागदपत्र मालकांकडेच
विक्रीकरिता दिलेल्या कारची कागदपत्रे मालकांकडेच असून त्यांनी ‘टोटल कार पॉइंट’ला ङोरॉक्स प्रती दिल्या होत्या. त्यामुळे या वाहनांची नियमानुसार विक्री करण्यात आली नसावी. ती नंबर प्लेट बदलून वापण्यात येत असावीत किंवा त्यांच्या सुटय़ा भागांची  विक्री करण्यात आली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे.