शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा संकुलाच्या उद्घाटनाचा फार्स

By admin | Updated: December 12, 2015 01:42 IST

रायगड जिल्हा क्रीडा संकुलाकरिता राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या आठ कोटीच्या निधीपैकी तब्बल पाच कोटी रुपये खर्चून अलिबागजवळच्या नेहुली या गावी बांधण्यात आलेल्या रायगड जिल्हा क्रीडा संकुलाचे

जयंत धुळप, अलिबागरायगड जिल्हा क्रीडा संकुलाकरिता राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या आठ कोटीच्या निधीपैकी तब्बल पाच कोटी रुपये खर्चून अलिबागजवळच्या नेहुली या गावी बांधण्यात आलेल्या रायगड जिल्हा क्रीडा संकुलाचे गेल्या ७ जून २०१५ ला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मात्र या जिल्हा क्रीडा संकुलात विविध खेळांकरिता आवश्यक असणाऱ्या सुविधाच उपलब्ध नसल्याने, रायगड जिल्हा क्रीडा परिषदेच्या जिल्हा क्र ीडा सप्ताहाचे आयोजन येथे करता येत नाही. परिणामी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलेला या क्रीडा संकुलाचा उद्घाटन समारंभ हा एक केवळ फार्स होता हे आता स्पष्ट झाले आहे. या प्रकाराबाबत जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे.रायगड जिल्हा क्रीडा संकुलातील असुविधांमुळे यंदाच्या जिल्हा क्र ीडा परिषदेच्या क्र ीडा सप्ताहाचे आयोजन १२ ते १८ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील विविध शाळांच्या मैदानावर करण्यात आले आहे. क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन शनिवारी १२ डिसेंबरला नागोठणे येथील जे. एच. अंबानी स्कूलच्या मैदानावर करण्यात येणार आहे. येथे स्थानिक खेळाडूंचे संचलन, लगोरी व तलवारबाजी या क्र ीडा स्पर्धा होणार आहेत. रविवार १३ डिसेंबरला कराटे स्पर्धांचे आयोजन अलिबाग तालुक्यांतील आवास येथील बा.ना.हायस्कूलच्या मैदानावर केले आहे. सोमवार १४ डिसेंबरला भारतीय पारंपरिक व्यायाम प्रकार व खेळांचे प्रदर्शनाचे अलिबाग तालुक्यांतील नागांव हायस्कूलच्या मैदानावर आयोजन केले आहे. गुरुवारी १७ डिसेंबरपर्यंत स्पर्धा होणार असून क्रीडा स्पर्धांच्या समारोप समारंभ शुक्रवारी १८ डिसेंबरला रायगड जिल्हा क्र ीडा संकुलातील सभागृहात होणार आहे.