शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांकडून समूह- संघटकांची बोळवण

By admin | Updated: July 4, 2017 07:13 IST

महापालिका आस्थापनेच्या विविध विभागांत ठोक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या भूलथापा देणाऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिका आस्थापनेच्या विविध विभागांत ठोक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या भूलथापा देणाऱ्या सत्ताधाऱ्यांना गेल्या दहा वर्षांपासून सरळ सेवेने भरती झालेल्या समूहसंघटकांचा मात्र विसर पडला आहे. केवळ आश्वासनांवर त्यांची बोळवण केली जात आहे. तर प्रशासनाने याप्रकरणी तोंडावर बोट ठेवले आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत अगदी अल्प मानधनावर काम करणाऱ्या या समूहसंघटकांची निराशा झाली आहे.महापालिकेच्या समाज विकास विभागात एकूण २१ समूहसंघटक कार्यरत आहेत. त्यांची भरती सरळ सेवेने झालेली आहे. राज्यातील औरंगाबाद, सोलापूर आणि नाशिक महापालिकेने अशाच प्रकारे सरळ सेवेतून भरती केलेल्या समूहसंघटकांना विशेष ठराव करून सेवेत कायम केले आहे. त्याच धर्तीवर आम्हालाही सेवेत कायम करावे, अशी या २१ समूहसंघटकांची मागणी आहे. त्यासाठी त्यांचा दहा वर्षांपासून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू आहे; परंतु केवळ आश्वासनावर त्यांची बोळवण केली जात आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या विविध विभागांत सुमारे ८३५ कर्मचारी ठोक मानधनावर काम करीत आहेत. त्यांना समान काम, समान वेतन धोरणानुसार वेतन श्रेणी लागू करण्याच्या दृष्टीने सत्ताधाऱ्यांनी चाचपणी सुरू केली आहे. तर विरोधी पक्षांनीही या मुद्द्यावर प्रशासनाला घेरले आहे. गेल्या महिन्यात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी ठोक मानधनावरील या कर्मचाऱ्यांची वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात बैठक घेऊन त्यांना आश्वासित केले. या कर्मचाऱ्यांना समान काम, समान वेतन धोरणानुसार वेतनश्रेणी देण्याच्या दृष्टीने लवकरच सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल. तसेच शासकीय नियमांच्या अधीन राहून त्यांना सेवेत कायम करण्याच्या दृष्टीनेही आगामी काळात प्रयत्न केले जातील, असे नाईक यांनी या बैठकीत सांगितले. एकूणच नियमाने अडचणीचे असतानाही ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचे सर्वंकष प्रयास सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहेत. तर दुसरीकडे कायद्याचा कोणताही अडथळा नसतानाही समूहसंघटकांना सेवेत कायम करण्याबाबत चालढकल केली जात आहे. त्यामुळे संघटकांत असुरक्षिततेची भावना पसरली आहे. दरम्यान, सफाई कामगार आणि ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना समान काम, समान वेतन धोरणानुसार वेतन देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. असे असले तरी आम्हाला सेवेत कायम करण्याच्या निर्णयावरही सकारात्मक विचार व्हावा, अशी मागणी समूहसंघटकांकडून करण्यात येत आहे.समूहसंघटकांची महत्त्वाची भूमिका शहर स्वच्छता अभियानांतर्गत शहरातील स्वच्छतागृहांचे सर्वेक्षण करण्यात आले. समूहसंघटकांनी घरोघरी जाऊन माहिती संकलित केली. त्याशिवाय विविध घटकांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांचा प्रचार करण्याचे महत्त्वपूर्ण काम हे समूहसंघटक करतात.