शिकवणी सुरू असतानाच स्लॅब कोसळला; एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १० जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं

By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 5, 2026 21:40 IST2026-03-05T21:31:02+5:302026-03-05T21:40:56+5:30

नवी मुंबईत इमारतीचा स्लॅब कोसळल्यामुळे एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Slab Collapse in Navi Mumbai Coaching Class 14 Year Old Student Dead 10 Others Rescued | शिकवणी सुरू असतानाच स्लॅब कोसळला; एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १० जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं

शिकवणी सुरू असतानाच स्लॅब कोसळला; एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १० जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं

Navi Mumbai Accident: नवी मुंबईच्या कोपरखैरणे सेक्टर २ येथील इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. स्लॅबखाली खासगी शिकवणीतले जवळपास ११ विद्यार्थी अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांची सुटका केली. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.

कोपरखैरणे सेक्टर २ येथील विद्या भवन इमारतीत ही दुर्घटना घडली. इमारत जीर्ण झालेली असतानाही तिचा रहिवासी वापर सुरु होता. त्याच इमारतीच्या तळमजल्यावरील घरात खासगी शिकवणी देखील चालत होती. गुरुवारी संध्याकाळी या शिकवणीत चौथी, पाचवीचे जवळपास ११ विद्यार्थी उपस्थित होते. त्याचवेळी तीन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब खाली कोसळला. स्लॅब पडल्याच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेऊन पोलिसांसह अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. 

दुर्घटनेची माहिती मिळताच कोपरखैरणे व वाशी अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याठिकाणी धाव घेऊन बचावकार्याला सुरवात केली. मात्र घरात जाण्याचा मार्गच बंद झाल्याने अडकेलेल्यांची सुटका करण्यात अडथळे येत होते. अखेर खिडकी तोडून आत जाऊन ढिगाऱ्याखालील मुलांची सुटका करण्यात आली. या दुर्घटनेत अनेकजण गंभीर जखमी झाले असून त्यांना वाशीच्या पालिका रुग्णालयासह जवळपासच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी मनीष म्हसे या चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. विद्या भवन इमारतीमध्ये यापूर्वी देखील स्लॅब कोसळण्याची घटना घडली होती. त्यानंतरही इमारतीचा वापर सुरूच राहिल्याने गुरुवारी घडलेल्या दुर्घटनेत चिमुकल्यांना मृत्यूच्या दाढेत जावे लागल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते दीपक बदक यांनी व्यक्त केली. 

घडलेली दुर्घटना गंभीर असून थोडक्यात सर्वच मुलांचे प्राण वाचले आहेत. लायन्स क्लब रुग्णालयात ३ तर एपेक्स रुग्णालयात ५ व पालिका रुग्णालयात एकावर उपचार सुरु असल्याचे नगरसेवक शिवराम पाटील यांनी सांगितले.  

दुर्घटना घडलेली विद्या भवन इमारत २८ वर्ष जुनी आहे. दुर्घटनेत जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. इमारतीचे स्ट्रकचर्ल ऑडिट केले जाणार आहे. तर पडझड झालेल्या घरातील रहिवाश्यांची पर्यायी व्यवस्था केली आहे- डॉ कैलास शिंदे, महापालिका आयुक्त

Web Title : ट्यूशन के दौरान स्लैब गिरा: छात्र की मौत, दस बचाए गए

Web Summary : नवी मुंबई में ट्यूशन के दौरान एक इमारत का स्लैब गिरने से ग्यारह छात्र फंस गए। दमकल कर्मियों ने उन्हें बचाया, लेकिन एक चौदह वर्षीय छात्र की मौत हो गई। पहले क्षतिग्रस्त हुई इमारत का उपयोग जारी था। घायलों को अस्पताल में भर्ती कराया गया; स्ट्रक्चरल ऑडिट की योजना, निवासियों को स्थानांतरित किया गया।

Web Title : Slab Collapse During Tutoring: Student Dies, Ten Rescued

Web Summary : Navi Mumbai building slab collapse trapped eleven students in tutoring. Firefighters rescued them, but one fourteen-year-old died. The building, previously damaged, was still in use. Injured are hospitalized; structural audit planned, residents relocated.