शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
4
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
5
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
6
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
7
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
8
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
9
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
10
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
11
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
12
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
13
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
14
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
15
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
16
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
17
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
18
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
19
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
20
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

"‘उमेद’च्या कार्यकारी अधिकाऱ्यांवर २२५ कोटींच्या अनियमिततेचा ठपका, आर. विमला यांच्यावर कारवाईची शिफारस"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2020 10:38 IST

प्रवीण जैन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने शासनाच्या निर्देशानुसार ७ ते ११ सप्टेंबर २0२0 या कालावधीत या कार्यालयत प्रत्यक्ष भेट देऊन उपलब्ध कागदपत्रांची तपासणी केली. याअंतर्गत मागील पाच वर्षांत संस्थेकडून वित्तीय मर्यादांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाल्याचे समितीच्या निदर्शनास आले आहे.

कमलाकर कांबळेनवी मुंबई : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद या शासकीय संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांच्यावर सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने २२५ कोटी रुपयांचा आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवला आहे. वित्त व ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रवीण जैन यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालात ऑगस्ट २0१६ ते ऑगस्ट २0२0 या कालावधीत उमेदमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहारांच्या कागदपत्रांच्या आधारे हा ठपका ठेवला आहे.

प्रवीण जैन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने शासनाच्या निर्देशानुसार ७ ते ११ सप्टेंबर २0२0 या कालावधीत या कार्यालयत प्रत्यक्ष भेट देऊन उपलब्ध कागदपत्रांची तपासणी केली. याअंतर्गत मागील पाच वर्षांत संस्थेकडून वित्तीय मर्यादांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाल्याचे समितीच्या निदर्शनास आले आहे. ऑगस्ट २०१६ ते ऑगस्ट २0२0 या कालावधीत आर. विमला (भा.प्र.से.) उमेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होत्या. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना २५ लाखांपर्यंतच्या बिलांना मान्यता देण्याचे अधिकार आहेत. परंतु आर. विमला यांनी ५0 ते ६0 लाखांपासून दीड ते दोन कोटी रुपयापर्यंतची बिले आपल्या अधिकारात मंजूर केल्याचा ठपका समितीने ठेवला आहे. 

आर. विमला यांनी कोणत्याही सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता न घेता आपल्या कार्यकाळात २२५ कोटींपेक्षा अधिक रकम बेकायदेशीररीत्या खर्च केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आर. विमला यांनी आपल्या अधिकाराचे उल्लंघन करीत राज्य सरकारच्या संबंधित विभागाची मंजुरी न घेता केंद्राकडे परस्पर प्रस्ताव पाठविल्याचा आक्षेपसुद्धा या अहवालात नोंदविण्यात आला आहे.

२२६ कर्मचाऱ्यांचे कंत्राट नूतनीकरण उमेद-महाराष्ट्र जीवनोन्नत्ती अभियान या प्रकल्पासाठी घेण्यात आलेले कंत्राटी पद्धतीचे मनुष्यबळ पुढील आदेश येईपर्यंत घेऊ नयेत, असे निर्देश असतानाही आर. विमला यांनी २२६ कर्मचाऱ्यांचे कंत्राट नूतनीकरण केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. नोंदविण्यात आलेले आक्षेप गंभीर असल्याने या प्रकाराला जबाबदार असलेल्या आर. विमला यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी शिफारस समितीचे अध्यक्ष प्रवीण जैन यांनी या चौकशी अहवालात केली आहे. दरम्यान, उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांच्याशी संपर्क साधण्यचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई