शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वलपमध्ये पाटील दाम्पत्य बनले सदस्य, पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील हा विजय ठरला चर्चेचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 09:43 IST

तालुक्यात २४ ग्रामपंचायतींपैकी खानावले आणि आकुर्ली ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीच्या झाल्या.

वैभव गायकर -पनवेल : तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वलप ग्रामपंचायतीमध्ये पाटील दाम्पत्य निवडून आले आहे. एकाच ग्रामपंचायतीमध्ये नवरा-बायको यापुढे ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असणार आहेत. भोलेनाथ पाटील व जयमाला पाटील हे दोघे दाम्पत्य वलप ग्रामपंचायतीत निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. दोघांनी विजय संपादित केल्याने तालुक्यातील हा विजय चर्चेचा ठरला आहे.तालुक्यात २४ ग्रामपंचायतींपैकी खानावले आणि आकुर्ली ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीच्या झाल्या. या निवडणुकीत वलप ग्रामपंचायत चर्चेत होती. त्या ठिकाणच्या ९ जागांसाठी पाटील आणि खुटारकर असे दोन दाम्पत्य निवडणुकीच्या रिंगणात होते. यापैकी भोलेनाथ पाटील व जयमाला पाटील हे दाम्पत्य निवडून आले आहे. तर खुटारकर दाम्पत्यात नवनाथ खुटारकर हे विजयी झाले असून संचिता खुटारकर या पराभूत झाल्या आहेत. या लढतीत दोन्ही दाम्पत्यांची थेट लढत नव्हती, मात्र एकाच ग्रामपंचायतीत दोन दाम्पत्य निवडणूक लढत असल्याने हा विषय चर्चेचा ठरला. 

मतदारांनी आम्हाला दिलेल्या कौलाबद्दल आम्ही निश्चितच आनंदी आहोत. ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही पती, पत्नी प्रयत्नशील राहू. मतदारांनी आमच्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल आम्ही मतदारांचे आभार व्यक्त करतो.- भोलेनाथ पाटील, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, वलप ग्रामपंचायत

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक