शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांच्या बदलीमुळे पनवेलकर नाराज

By admin | Updated: March 17, 2017 06:02 IST

महापालिकेचे पहिले आयुक्त सुधाकर शिंदे यांनी सहा महिन्यांमध्ये शहराचा चेहरा बदलला होता. रस्ते, पदपथावरील अतिक्रमणे हटविली.

मयूर तांबडे , पनवेलमहापालिकेचे पहिले आयुक्त सुधाकर शिंदे यांनी सहा महिन्यांमध्ये शहराचा चेहरा बदलला होता. रस्ते, पदपथावरील अतिक्रमणे हटविली. स्मार्ट सिटीच्या दिशेने शहराची वाटचाल सुरू झाली होती. पण अचानक शासनाने त्यांची बदली केल्याने शहरवासीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बदलीचा शहराच्या विकासावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. १ आॅक्टोबर २०१६ रोजी पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर सुधाकर शिंदे यांची आयुक्तपदावर नियुक्ती झाली. पहिल्या दिवसापासून त्यांनी कामाचा धडाका सुरू केला. बेकायदा हातगाड्या, बॅनरबाजी, अनधिकृत बांधकाम यावर आयुक्तांनी मोठ्या प्रमाणात कारवाई करत पनवेल शहर व आजूबाजूच्या परिसराला स्वच्छ केले होते. अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. शहर पहिल्यांदा होर्डिंगमुक्त झाल्याने शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले होते. पनवेलमधील सर्व प्रमुख रस्ते व पदपथावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले होते. महामार्गावरही रोडच्या बाजूलाही अनधिकृत बांधकाम व फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले होते. आयुक्तांनी सरसकट सर्व अतिक्रमणे हटविली. पहिल्यांदा रस्ते व पदपथ मोकळे दिसू लागले होते. फक्त अतिक्रमणांवर कारवाई नाही तर भविष्याचा वेध घेवून महापालिकेच्या सर्व विभागांची रचना करण्यास सुरवात केली होती. १२०० कोटी रूपये उत्पन्नाचा आराखडा तयार केला होता. शहर हागणदारीमुक्त करण्यातही यश मिळविले होते. स्मार्ट सिटीच्या दिशेने शहराची वाटचाल सुरू असताना अचानक आयुक्तांची बदली केल्यामुळे नागरिकांना धक्का बसला आहे. महापालिकेची निवडणूक एप्रिल -मे दरम्यान होणार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आयुक्त सुधाकर शिंदे सत्ताधारी पक्षातील एका मंत्र्याचे भाऊ असल्याने महापालिकेची निवडणूक नि:पक्षपाती वातावरणात पार पडावी यासाठी आयुक्त सुधाकर शिंदे यांची बदली करण्याची मागणी केली जात होती. दुसरीकडे आयुक्तांनी सुरू केलेल्या धडक कारवाईचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता असल्याने त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न सुरू होते. शिंदेंची बदली; मुंढेंना काअभय ?पनवेलचे आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या बदलीविषयी नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून शासन पक्षपातीपणे वागत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे यांनी सहा महिन्यांमध्ये पनवेलचा चेहरा बदलला होता. तेथील फेरीवाले, अतिक्रमणावर कारवाई केली होती. सर्वांना विश्वासात घेवून काम करत होते. पण महापालिका निवडणुकीमध्ये त्यांच्या निर्णयांचा भाजपाला फटका बसण्याची शक्यता असल्यानेच त्यांची बदली केली. परंतु नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केल्यानंतरही त्यांची बदली केली जात नाही. राष्ट्रवादीवर राजकीय सूड उगविण्यासाठीच मुंढे यांना अभय दिले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीचे आव्हान आहे. त्याच्या कामाला प्राधान्य देऊन मतदार याद्या अचूक व दोषरहित बनवणे हे माझे पहिले काम असेल. त्यानंतर निवडणूक अधिसूचना निघाल्यावर निवडणूक अधिकारी व त्यासंबंधीची कामे करण्यात येतील असे नवीन महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी पदभार सांभाळल्यावर बोलताना सांगितले. निवडणुकीचा फायदा घेऊन अनधिकृत बांधकाम करण्याचा प्रयत्न केला जातो त्याकडे लक्ष ठेवून त्याला प्रतिबंध केला जाईल. नवीन महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत लक्षात घेऊन उत्पन्न वाढवण्याकडे लक्ष देण्यात येईल . महापालिकेने यापूर्वी हाती घेतलेली विकासकामे पूर्ण केली जातील. हे सर्व आमचे टीम वर्क आहे. महापालिकेचे नवीन पदाधिकारी येईपर्यंत आमची जबाबदारी असल्याने ती आम्ही पूर्ण करू. नवीन कर्मचारी शासनाकडून मंजूर करण्यासाठी व सिडकोकडील हस्तांतरण प्रक्रि या पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.