शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्हा विभाजनाला विरोध

By admin | Updated: August 31, 2015 03:27 IST

जिल्ह्याचे विभाजन करताना नवीन जिल्ह्याला किमान तीन हजार कोटी रुपये द्यावे लागतात. राज्य सरकारला दैनंदिन खर्च भागविण्यासाठीच महिन्याला तीन हजार कोटी रुपयांचे

अलिबाग : जिल्ह्याचे विभाजन करताना नवीन जिल्ह्याला किमान तीन हजार कोटी रुपये द्यावे लागतात. राज्य सरकारला दैनंदिन खर्च भागविण्यासाठीच महिन्याला तीन हजार कोटी रुपयांचे कर्ज काढावे लागत आहे. या सरकारकडे साधे चहा पिण्यासाठीही पैसे नाहीत. तेच जिल्हा विभाजनाच्या गोष्टी करीत आहेत, अशी खरमरीत टीका अलिबागचे आमदार सुभाष पाटील यांनी केली. रायगड जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतपेढी लि.ची ५२ वी वार्षिक सभा रायगड जिल्हा परिषदेच्या ना.ना.पाटील सभागृहात पार पडली. त्याप्रसंगी आमदार पाटील बोलत होते.सध्या सरकार सुमारे ४२ जिल्ह्यांचे विभाजन करणार असल्याचे सांगत आहे. त्यामध्ये रायगड जिल्ह्याचाही समावेश असून महाड अथवा माणगाव हा नवीन जिल्हा होणार असल्याच्या वावड्या उठत आहेत. सरकारचे महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एकवाक्यता नाही. जिल्ह्याचे विभाजन करणे सोपे नाही. त्यामुळे रायगड जिल्ह्याचे विभाजन होणार नसल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.नवीन जिल्ह्याची निर्मिती करताना त्या जिल्ह्याला सोयी-सुविधांसाठी किमान तीन हजार कोटी रुपये द्यावे लागतात. ४२ जिल्ह्यांचे विभाजन करताना सरकारला अब्जावधी रुपये खर्च करावे लागतील. सध्या सरकारचे एक लाख ३५ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न आहे. ७५ हजार कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या वेतनावर आणि २० हजार कोटी रुपये निवृत्ती वेतनावर वर्षाला खर्च करावे लागतात. सरकारला महिन्याला तीन हजार कोटी रुपयांचे कर्ज घ्यावे लागणार आहे. कर्जात बुडालेले सरकार एक कप साधा चहाही पिऊ शकत नाहीत, अशी सरकारची परिस्थिती असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी रायगड जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतपेढीचे अध्यक्ष सुरेश म्हात्रे, सचिव राजेंद्र गायकवाड, संचालक प्रकाश म्हात्रे, प्रकाश काळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)