शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल नगरपरिषदेची एनएमएमटीला नाहरकत

By admin | Updated: August 31, 2015 03:22 IST

नवी मुंबई महापालिकेच्या एनएमएमटीला अखेर पनवेल नगरपरिषदेने ना हरकत दर्शविली आहे. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे.

पनवेल : नवी मुंबई महापालिकेच्या एनएमएमटीला अखेर पनवेल नगरपरिषदेने ना हरकत दर्शविली आहे. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. नगरपरिषदेवर काही दिवसांपूर्वी कफसह एकूण ५० संस्थानी मोर्चा काढत नगरपरिषदेच्या कामकाजाचा निषेध केला होता. याचे पडसाद याठिकाणी उमटल्याचे पहावयास मिळाले . शहरात नगरपरिषदेची परिवहन सेवा सुरु करण्यात येईल असे यंदाच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले आहे. मात्र अद्याप ही सेवा सुरु झाली नसून शहरातील नागरिकांना परिवहन सेवा उपलब्ध व्हावी यासाठी कफ या संस्थेने शहरात नवी मुंबई म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट कंपनीस परिषदेमार्फत नाहरकत दाखला देण्याची मागणी केली होती . ही मागणी मान्य करीत नगरपरिषद काही अटीवर नवी मुंबई महापालिका परिवहनची बससेवा सुरु करण्याबाबत सकारात्मक असल्याचे समजते. मात्र या वेळी विरोधी पक्षनेते संदीप पाटील यांनी बससेवा सुरु करायची असेल तर त्यांच्यावर अटी किंवा बंधने घालू नयेत अशी सुचना केली आहे. सध्या पनवेल महानगरपालिका स्थापन करण्याचा विषय गाजत असताना कामकाजावर नाराजी व्यक्त करीत खारघर, कळंबोतील रहिवाशांनी पनवेलमध्ये समाविष्ट होण्यास विरोध दर्शविला आहे. अशा वेळी पनवेल नगरपरिषद जवळच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सेवेची मदत घेण्याचा विचार करत असेल तर पनवेल नगरपरिषदेच्या दृष्टीने नकारात्मक वातावरण करणारे आहे. पीएमटी या बससेवेची घोषणा करुन ती रस्त्यांवर कधी धावणार असा प्रश्न सध्या पनवेलकरांना पडला आहे. शहरात दिशादर्शक फलक लावणे, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहातील रंगमंचाला नाट्यतपस्वी कै. किशोर जोशी यांचे नाव देण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली.