शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
2
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
3
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
4
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
5
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
6
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
7
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
8
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
10
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
11
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
12
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
13
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
14
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
15
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
16
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
17
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
18
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
19
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
20
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 08:10 IST

Pakistani Container Seized by DRI in JNPA: वाहतुकीवरील निर्बंधांचे उघडपणे उल्लंघन करून पाकने ओळख लपवून हे ३९ कंटेनर थेट दुबई, यूएईमार्गे जेएनपीए बंदरातून भारतात पाठविले.

उरण : पाकिस्तानने यूएईमार्गे जेएनपीए बंदरात पाठवलेले ३९ कंटेनर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. यात नऊ कोटी रुपयांचे पाकिस्तानी बनावटीचे १,११५ मेट्रिक टन खजूर आणि गरम मसाले जप्त केले आहेत. या प्रकरणी एका आरोपीला अटक केल्याची माहिती डीआरआयच्या मुंबईतील अधिकाऱ्यांनी दिली.

वाहतुकीवरील निर्बंधांचे उघडपणे उल्लंघन करून पाकने ओळख लपवून हे ३९ कंटेनर थेट दुबई, यूएईमार्गे जेएनपीए बंदरातून भारतात पाठविले. पाकिस्तानच्या या कारनाम्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली. 

अन्य देशांच्या मार्गे प्रामुख्याने दुबई, यूएई यासारख्या देशांद्वारे होणारी पाकिस्तानी बनावटीच्या वस्तूंची बेकायदेशीर आयात रोखण्यासाठी ‘डीआरआय’ने ‘ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट’ ही मोहीम सुरू केली आहे.

वाहतुकीवरील निर्बंधांचे उघडपणे उल्लंघन 

या मोहितेंतर्गत कारवाई करीत ‘डीआरआय’च्या अधिकाऱ्यांनी जेएनपीए बंदरातून पाकिस्तानी ३९ कंटेनर जप्त केले आहेत. वाहतुकीवरील निर्बंधांचे उघडपणे उल्लंघन करून पाकिस्तानने ओळख लपवून हे ३९ कंटेनर थेट दुबई, यूएईमार्गे जेएनपीए बंदरातून भारतात पाठविले. पाकिस्तानच्या या कारनाम्याची माहिती ‘डीआरआय’च्या अधिकाऱ्यांना मिळाली. 

विशेष मोहीम

दुबई, यूएई यासारख्या देशांद्वारे होणारी पाकिस्तानी बनावटीच्या वस्तूंची बेकायदेशीर आयात रोखण्यासाठी ‘डीआरआय’ने ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट अंतर्गत जेएनपीए बंदरातून ३९ पाकिस्तानी कंटेनर जप्त केले.

... अशी केली हेराफेरी

सुरुवातीला हा माल एका कंटेनर आणि जहाजावरून पाकिस्तानातून दुबईला नेण्यात आला आणि नंतर तो भारताकडे जाणाऱ्या दुसऱ्या कंटेनर आणि जहाजांवर हलवण्यात आला. मालाच्या तपासणीदरम्यान पाकिस्तानची हेराफेरी उघडकीस आली. 

हा माल पाकिस्तानच्या कराची बंदरातून निघाला आणि दुबईतील जबेल अली बंदरावर तो भारताकडे जाणाऱ्या जहाजांवर चढवण्यात आला. याशिवाय, पाकिस्तानी संस्थांबरोबर झालेले पैशांचे हस्तांतरण/ आर्थिक संबंध उघडकीस आले आहेत.

टॅग्स :JNPTजेएनपीटीPakistanपाकिस्तान