शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांसाठी महापालिकेची हेल्पलाइन

By admin | Updated: August 31, 2015 03:24 IST

शहरातील अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने सर्व विभाग कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्ष तयार केला आहे. नियंत्रण कक्षांसाठी हेल्पलाइन नंबर तयार केले

नवी मुंबई : शहरातील अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने सर्व विभाग कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्ष तयार केला आहे. नियंत्रण कक्षांसाठी हेल्पलाइन नंबर तयार केले असून यापुढे अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम तीव्र केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नवी मुंबईध्ये अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढू लागले आहे. सिडको व एमआयडीसीच्या जागांवर झोपड्यांसह बहुमजली इमारती बांधण्यात येत आहेत. दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे. बेकायदेशीर इमारतींमधील घरे विकून सामान्य नागरिकांची फसवणूक केली जात आहे. यामुळे महापालिकेने सर्व विभाग कार्यालयांमध्ये तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. या तक्रार निवारण कक्षाद्वारे अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५३ (८)अनुषंगाने अनधिकृत बांधकामावर कार्यवाही करण्याकरिता विभाग अधिकारी यांना जुलै २०१५ मध्ये पदनिर्देशित अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. शहरात कुठेही अनधिकृत बांधकाम होत असल्यास नागरिकांना त्याबाबतची माहिती दूरध्वनीद्वारे संबंधित विभाग अधिकारी यांना सहजपणे व विनामूल्य देता यावी यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयामध्ये टोल फ्री दूरध्वनी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवय पूर्वी सुरू करण्यात आलेले १८००२२२३०९ व १८००२२२३१० हे टोल फ्री नंबरही सुरूच ठेवण्यात येणार आहेत. शहरात महापालिकेची बांधकाम पूर्वपरवानगी न घेता किंवा भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून न घेता बांधलेल्या इमारतीत फ्लॅटची खरेदी करू नये. या इमारतींवर महापालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय अशा इमारतींना पाणीपुरवठा, मलनिस्सारण सुविधा पुरविण्यात येणार नाहीत असे पालिकेने स्पष्ट केले आहे. अतिक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांनीही महापालिकेस पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)