मुंबईचे डबेवाले पंढरीच्या वारीला

By Admin | Updated: July 27, 2015 01:45 IST2015-07-27T01:45:23+5:302015-07-27T01:45:23+5:30

आषाढी एकादशीनिमित्त माउलीचे दर्शन घेण्यासाठी मुंबईचे डबेवाले पंढरपूरला निघाले आहेत. त्यामुळे डबेवाले दोन दिवसांच्या सुटीवर

Mumbai's Dabewale Pandari ji | मुंबईचे डबेवाले पंढरीच्या वारीला

मुंबईचे डबेवाले पंढरीच्या वारीला

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त माउलीचे दर्शन घेण्यासाठी मुंबईचे डबेवाले पंढरपूरला निघाले आहेत. त्यामुळे डबेवाले दोन दिवसांच्या सुटीवर जाणार आहेत. परिणामी, २७ आणि २८ जुलै रोजी डबे पोहोचविण्याची सेवा पूर्ण बंद राहील. विठ्ठलाच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या निघाल्या आहेत. मुंबईच्या डबेवाल्यांनाही विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागली आहे. त्यामुळे ते पंढरपूरला निघाले आहेत. दरम्यान, यंदाच्या एकादशीपासून डबेवाले आॅनलाइन व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकत आहेत, त्यामुळे या वेगळ्या
वाटेसाठी माउलींचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही जात आहोत,
असे मुंबई जेवण डबे वाहतूक
मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब करवंदे म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Mumbai's Dabewale Pandari ji