शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण कर्मचाऱ्यांना हवे पोलीस संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 00:44 IST

मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी; राजकीय हस्तक्षेपामुळे थकीत वीज बिल वसुलीस अडथळा

वैभव गायकरलोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : लॉकडाऊनच्या कार्यकाळात दिलेल्या सरासरी वीज बिलावरून निर्माण झालेला गोंधळ अद्याप शमलेला नाही. वीज बिलात सवलत मिळेल या आशेने अद्याप असंख्य ग्राहकांनी आपला वीज बिल भरणा केलेला नाही. अशा ग्राहकांकडून थकीत बिल वसुलीची मोहीम ‘महावितरण’ने हाती घेतली असून वीज बिल न भरलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यास ‘महावितरण’ने सुरुवात केली आहे. मात्र, या मोहिमेदरम्यान कर्मचाऱ्यांना विविध त्रासांना सामोरे जावे लागत असल्याने ‘महावितरण’मधील कर्मचाऱ्यांच्या संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. 

   राज्यभरात ६० हजार पेक्षा जास्त ‘महावितरण’चे कर्मचारी ज्या संघटनेशी जोडले गेले आहेत. अशा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन या संघटनेने १ मार्चल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्रव्यवहार करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज्यात ‘महावितरण’चे एकूण २ कोटी ६५ लाख वीज ग्राहक आहेत. यामध्ये विविध श्रेणीचे ग्राहक आहेत. २०२० मध्ये उद्धवलेल्या कोरोनाकाळात ‘महावितरण’ने अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवण्यास मोठी मेहनत घेतली. त्यामध्ये मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना आपला जीवदेखील गमवावा लागला. आजच्या घडीला ग्राहकांवर सुमारे ७१५०४ कोटी थकीत वीज बिलाची रक्कम असताना ‘महावितरण’कडून कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात वसुलीसाठी दबाव येत आहे. ‘महावितरण’मधील अपुरे मनुष्यबळ व दैनंदिन देखभाल दुरूस्ती या कामांसह थकीत वीज बिल वसुलीचा रेटा कर्मचाऱ्यांच्या मागे लावला जात आहे. अशावेळी वसुलीचे उद्दिष्ट साध्य न केल्यास निलंबनासारख्या कारवाईला कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. थकीत वीज बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यास गेलो असता मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप, महावितरण कार्यालयाची तोडफोड असे प्रकार घडत असल्याचे संघटनेचे सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे.      ‘महावितरण’चे कर्मचाऱ्यांवर थकीत वीज बिलासाठी ‘महावितरण’चा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव तर वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलो असता राजकीय पक्ष,

संघटनेचा दबाव येत असल्याने कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात मध्येच भरडला जात असल्याने मुख्यमंत्र्यांनी या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी भोयर यांनी केली आहे. 

थकीत वीज बिल ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यास गेले असता आम्हाला ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. कित्येक वेळेला आमच्यावर हल्लेदेखील होत आहेत. अशा परिस्थिती आणखी चिघळू नये याकरिता पोलीस बंदोबस्ताची मागणी आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे. - कृष्णा भोयर, सरचिटणीस, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन