शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत किरकोळ कारणांवरून वारंवार हाेताहेत जीवघेणे हल्ले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 10:55 IST

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे आई-वडील एका अपहरण प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत.

- सूर्यकांत वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सराईत गुन्हेगारांना रोखण्याचे पोलिसांपुढे आव्हान असतानाच अनपेक्षितपणे घडणारे गुन्हेही पोलिसांची डोकेदुखी वाढवत आहेत. एखाद्या किरकोळ प्रसंगातदेखील अपहरण, वार असे प्रकार घडत आहेत. सर्वसामान्य व्यक्तीही अशा प्रसंगात अडकून कायद्याच्या कचाट्यात सापडत आहेत. त्यामुळे घराबाहेर पडताना डोक्यावर बर्फ अन् तोंडात  साखर ठेवूनच बाहेर पडणे योग्य, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे आई-वडील एका अपहरण प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. ऐरोलीत झालेल्या किरकोळ अपघातावेळी दीपक खेडकर यांनी कारच्या नुकसानभरपाईच्या मागणीसाठी ट्रकचालकाचे अपहरण करून त्याला पुण्याला नेले होते. यावरून रस्त्यांवर अनपेक्षित घडणाऱ्या घटनांना कशा प्रकारे गुन्हेगारी वळण लागत आहे, याचेही दर्शन घडत आहे. रस्त्यांवर होणारे वाद मुंबई, नवी मुंबईकरांसाठी काही नवीन नाही. वाहतूककोंडी, बेशिस्त चालक, सिग्नल तोडण्याची घाई यामध्ये सतत वाद होतच असतात. 

हॉर्न वाजवल्याने चाकूहल्लावाशीतील ब्ल्यू डायमंड चौकात यापूर्वी सिग्नलवर उभ्या दुचाकीस्वाराला पाठीमागून आलेल्या दुचाकीने हॉर्न वाजवून हटण्यास सांगितल्याने झालेल्या वादातून एकाला चाकूने भोकसल्याची घटना घडली होती. मागील चार वर्षांत अशा प्रकारे हाणामारी, हल्ल्याच्या सहा सात घटना नवी मुंबईतल्या विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत.

जाब विचारणाऱ्या महिलेचा विनयभंग वाहनाला वाहन घासल्याने शिवीगाळ, मारहाण यावरून येणाऱ्या तक्रारीचेही प्रमाण अधिक आहे. दोनच दिवसांपूर्वी एका महिलेच्या कारला दुसऱ्या कारने धडक दिल्याने महिलेने कारमधील व्यक्तींना जाब विचारला असता त्यांनी थेट महिलेचा विनयभंगच केल्याचा प्रकारही घडला. घराबाहेर निघणाऱ्या बहुतांश व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने मानसिक तणावात असतात. त्यात रस्त्यांवरील परिस्थितीमुळे त्यांचा पारा अधिक चढून असे प्रकार घडत आहेत. परिणामी अशा व्यक्तींवरही गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावरही गुन्हेगारीचा ठपका बसत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Petty Disputes Escalating into Deadly Attacks in Navi Mumbai: Report

Web Summary : Minor incidents in Navi Mumbai are increasingly leading to serious crimes like assault and abduction. Road rage incidents, triggered by traffic disputes and reckless driving, often escalate into violence. Police face challenges as even ordinary citizens get caught in legal troubles due to heightened tensions.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी