शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत होणाऱ्या वाहतूक कोंडीची माहिती मोबाइल अ‍ॅपद्वारे

By admin | Updated: August 25, 2015 01:46 IST

वाहतुकीसंदर्भात सर्व माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाच्या वतीने ‘नवी मुंबई ट्रॅफिक अ‍ॅप’ हे अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅप मार्च

नवी मुंबई : वाहतुकीसंदर्भात सर्व माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाच्या वतीने ‘नवी मुंबई ट्रॅफिक अ‍ॅप’ हे अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅप मार्च महिन्यात विकसित केले होते. या अ‍ॅपच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम, रस्ता सुरक्षा नियमावली, रुग्णालये, अग्निशमन केंद्र, वाहतुकीचे नियम व चिन्हे आदी सर्व माहिती देण्यात आली होती. याच अ‍ॅपमध्ये आता सुधारणा करून लवकरच वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची माहितीही या अ‍ॅपद्वारे दिली जाणार आहे. मार्च महिन्यात विकसित झालेल्या या अ‍ॅपला आत्तापर्यंत नवी मुंबईकरांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. या अ‍ॅपद्वारे पुरविले जाणारे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या पोलीस स्थानकांचे संपर्क, रुग्णालयांची माहिती, रुग्णवाहिका, टोविंग वाहने यांची माहिती दिलेली आहे. याच अ‍ॅपमध्ये बदल करून काहीच दिवसांमध्ये शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची माहिती दिली जाणार आहे. गणेशोत्सवादरम्यान अनेकवेळा वाहतूक मार्गात अडथळे येतात. त्यामुळे प्रवाशांचे कोणत्याही प्रकारचे हाल होऊ नये याकरिता गणेशोत्सवापूर्वी हे सुधारित अ‍ॅप वापरात आणणार असल्याची माहिती नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली. या नवीन बदलामुळे शहरातील रस्त्यांवरील दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहितीही पुरविली जाणार असून कोणत्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे, याची देखील माहिती यावर उपलब्ध होणार असल्याची माहिती नवी मुंबई पोलीस उपआयुक्त अरविंद साळवे यांनी दिली.या अ‍ॅपच्या युझर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांकडून चांगले अभिप्राय मिळत असल्याची माहिती साळवे यांनी दिली. या अ‍ॅपमध्ये दिली जाणारी माहिती ही चित्रस्वरूपात असल्याने वापरकर्त्यांना ती सहज समजण्याजोगी आहे. महत्त्वाच्या वेळांमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या तत्काळ सूचना या माध्यमातून पुरविल्या जाणार आहेत. कॅलिबर टेक्नॉलॉजी, सीवूड्स नेरुळ यांनी हे अ‍ॅप विकसित करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे.