शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
4
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
5
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
7
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
8
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
9
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
10
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
11
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
12
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
13
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
14
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
15
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
16
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
17
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
18
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
19
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
20
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर

खासदारांच्या गृहनिर्माण संस्थेला सिडकोकडून वाटाण्याच्या अक्षता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2021 12:10 AM

भूखंड वाटपास टाळाटाळ : पात्र ठरूनही कागदपत्रांची होतेय नव्याने मागणी

कमलाकर कांबळे लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सिडकोत लक्ष्मीदर्शन झाल्याशिवाय कोणतेही काम होत नाही, ही वस्तुस्थिती सर्वश्रुत आहे. सिडकोतील भ्रष्ट मनोवृत्तीचा फटका देशाचे सर्वोच्च सभागृह असलेल्या संसदेतील खासदारांनासुध्दा बसला आहे. कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करूनही खासदारांच्या गृहनिर्माण संस्थेला भूखंड देण्यास संबंधित विभागाकडून टाळाटाळ केली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या संस्थेचे सदस्य असलेल्या काही खासदारांनी सिडकोच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे. सिडकोने नवी मुंबईची उभारणी केली आहे. त्यासाठी आतापर्यंत दीड लाखांपेक्षा अधिक घरांचे निर्माण केले आहे. सुरुवातीच्या काळात विविध घटकांच्या गृहनिर्माण सोसायट्यांना गृहसंकुल उभारण्यासाठी भूखंड वाटप करण्यात आले होते. कालांतराने सिडकोने ही योजना बंद केली. परंतु सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक तथा नगरविकास विभागाचे विद्यमान सचिव भूषण गगरानी यांनी २०१६ मध्ये गृहनिर्माण संस्थांना भूखंड देण्याची योजना पुन्हा सुरू केली. त्यानुसार आमदार, खासदार, कलावंत व पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले. त्यानुसार  राज्यातील बावीस खासदारांनी  मातोश्री या नावाने गृहनिर्माण संस्था स्थापन करून खारघर सेक्टर १२ येथील २२०० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडासाठी सिडकोकडे अर्ज केला.  अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे जोडण्यात आली होती. विशेष म्हणजे सिडकोच्या स्क्रुटीनी कमिटीकडून खासदारांनी  सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. तपासणीत सर्व कागदपत्रे ग्राह्य ठरल्याने खासदारांच्या गृहनिर्माण संस्थेचा अर्ज योजनेसाठी पात्र ठरविण्यात आला.  विशेष म्हणजे नियोजित भूखंडासाठी खासदारांनी स्थापन केलेल्या मातोश्री गृहसंस्थेचा एकमेव अर्ज सिडकोला प्राप्त झाला. भूखंडाचा दर पूर्वनिश्चित असल्याने  नियमानुसार सदर गृहनिर्माण संस्थेलाच भूखंड देणे क्रमप्राप्त होते. परंतु अर्थकारणाची बाधा झालेल्या संबंधित विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एकच अर्ज आल्याचे कारण देत सोडत पुढे ढकलली. त्यानंतर  अपूर्ण सदस्य संख्या असलेल्या आजी-माजी आमदारांच्या दत्तकृपा गृहनिर्माण संस्थेला यात सहभागी करून घेण्यात आले. त्यानुसार २०१९ मध्ये नियोजित भूखंडासाठी मातोश्री आणि दत्तकृपा गृहनिर्माण संस्थेची सोडत काढण्यात आली. नियमबाह्यरीत्या काढलेल्या या सोडतीतसुध्दा मातोश्री गृहनिर्माण संस्था पात्र ठरली. असे असतानाही आजतागायत या संस्थेला भूखंडाचे वाटप केले गेले नाही. मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे मातोश्री गृहनिर्माण संस्थेचे मुख्य प्रवर्तक आहेत.   सिडकोकडे यासंदर्भात त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांबरोबर याबाबत अनेक बैठकाही झाल्याचे समजते.  परंतु संबंधित विभागाचे अधिकारी दाद देत नसल्याने हे खासदारसुध्दा हतबल झाले आहेत.  अर्जासोबत खासदारांनी आवश्यक कागदपत्रे यापूर्वीच सिडकोकडे सादर केली आहेत.  छाननीनंतर ते पात्रही ठरले आहेत. परंतु पुन्हा प्राप्तीकर प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड आदी कागदपत्रांची मागणी केली जात आहे. देशाच्या सर्वोच्च सभागृहाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारांनाच अशा प्रकारे वेठीस धरले जात असल्याने सिडकोच्या अर्थपूर्ण कारभाराविषयी नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, यासंदर्भात सिडकोचे पणन विभागाचे व्यवस्थापक  प्रशांत भांगरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर तांत्रिक कारणांमुळे भूखंड वाटप लांबणीवर पडले आहे.  मात्र आता प्रक्रिया सुरू असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी स्पष्ट केले आहे. 

९० टक्के खासदार शिवसेनेचेमातोश्री गृहनिर्माण संस्थेत ९० टक्के खासदार शिवसेनेचे आहेत. विशेष म्हणजे राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचेसुध्दा यात नाव आहे. त्याशिवाय हेमंत तुकाराम गोडसे, वैभव नाईक, अरविंद सावंत, भारत गोगवले, हिना गावित,  शिवाजी आढळराव आदी आजी-माजी बावीस खासदार या गृहनिर्माण संस्थेचे सदस्य आहेत.