ग्रामपंचायतींनी थकवली दीड कोटीची पाणीपट्टी

By Admin | Updated: September 25, 2015 02:36 IST2015-09-25T02:36:12+5:302015-09-25T02:36:12+5:30

पनवेल पंचायत समितीच्या अधिपत्याखाली येणाऱ्या ७ ग्रामपंचायतींनी गेल्या काही वर्षांपासून तळोजा एमआयडीसीची १ कोटी ७९ लाखांची पाणीपट्टी थकवली आहे

Gram Panchayats get 1.5 crores water tank | ग्रामपंचायतींनी थकवली दीड कोटीची पाणीपट्टी

ग्रामपंचायतींनी थकवली दीड कोटीची पाणीपट्टी

शैलेश चव्हाण, तळोजा
पनवेल पंचायत समितीच्या अधिपत्याखाली येणाऱ्या ७ ग्रामपंचायतींनी गेल्या काही वर्षांपासून तळोजा एमआयडीसीची १ कोटी ७९ लाखांची पाणीपट्टी थकवली आहे. या प्रकरणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र पाटील यांनी ग्रामसेवकांना थकीत बिल लवकरात लवकर भरणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तीन महिने उलटले तरी थकीत बिले भरण्यात आलेली नाही. तळोजा एमआयडीसीकडून ग्रामपंचायतींना थकीत बिले भरण्यासाठी १0 दिवसांची मुदत एका नोटिसीद्वारे देणार असून पाणीपट्टी न भरल्यास ग्रामपंचायतींची पाणीकपात करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Gram Panchayats get 1.5 crores water tank