शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

होल्डिंग पाँडमधील अडथळ्यांमुळे नवी मुंबई शहराला पुराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 23:20 IST

गाळाचे साम्राज्य : बेसुमार खारफुटी; अतिवृष्टीत शहरात पाणी

योगेश पिंगळे ।

नवी मुुंबई : शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी होल्डिंग पाँडची निर्मिती करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या होल्डिंग पाँडमध्ये गाळाचे साम्राज्य वाढले असून, खारफुटी बेसुमार वाढली आहे. त्यामुळे शहरातील पावसाळी पाण्याचा निचरा होताना विविध अडथळे येत असून, अतिवृष्टीत शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे.

मुसळधार पावसात मुंबईप्रमाणे शहरात पाणी शिरू नये, यासाठी सिडकोने सविस्तर अभ्यास करून शहरात विविध ठिकाणी ११ ठिकाणच्या खाडीकिनाऱ्याजवळ होल्डिंग पाँड तयार तयार केले होते. ओहोटी सुरू होताच पाँडमध्ये जमा झालेल्या पाण्याचा दाब वाढेल आणि दरवाजे आपोआप उघडून त्यातील पाणी आपोआप खाडीत जाईल, अशी या पाँडची रचना करण्यात आली होती. शहरात पडणारा पाऊस पाहता, महापालिकेच्या माध्यमातून पाण्याचा निचरा अधिक होण्यासाठी या होल्डिंग पाँडची क्षमता वाढवून १५० मिमी करण्यात आली होती. या पाँडमध्ये गेल्या काही वर्षांत गाळ मोठ्या प्रमाणावर साचला आहे. तसेच खारफुटीची जंगले उभी राहिली आहेत. होल्डिंग पाँडमधील पाणी उपसण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून पंप बसविण्यात आल्या आहेत, परंतु गाळ साचल्याने अनेक अडचणी येत आहेत. गाळ काढण्यासाठी पालिकेकडून अद्याप परवानगी न मिळाल्याने काम प्रलंबित आहे. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहत आहे. सीबीडी विभागातील सेक्टर १, १ ए, २, ३, ४, ५, ६, ९, ९ एन आदी सेक्टरमध्ये जमा होणारे पावसाचे पाणी, तसेच सीबीडीतील डोंगरावरील काही प्रमाणात पावसाचे पाणी सीबीडी सेक्टर १३ येथील होल्डिंग पाँडमध्ये वाहून जाते.हा गाळ, बेसुमार वाढलेली खारफुटी, यामुळे २२ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसात सीबीडी येथील नागरी वसाहती आणि बाजारपेठेत पाणी शिरून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. होल्डिंग पाँडमधील गाळ काढला न गेल्यास, अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे.शहरातील होल्डिंग पाँडमधील गाळ काढण्यासाठी परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. सीबीडी आणि वाशी येथील होल्डिंग पाँडजवळ पावसाळी उदंचन केंद्र नव्याने बांधण्याचे प्रस्तावित आहे. गेल्या आठ महिन्यांत याबाबत टेंडर काढण्यात आले आहे, परंतु प्रतिसाद मिळालेला नाही.-सुरेंद्र पाटील (शहर अभियंता, न.मुं.म.पा.)

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई