शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित मागण्यांसाठी मच्छीमारांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:37 IST

महाराष्टÑ मच्छीमार कृती समितीतर्फे  महाराष्टÑातील किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांवर होत असलेल्या अन्यायाबाबत न्याय मिळविण्यासाठी मुंबई येथे महाराष्टÑ विधान भवनावर मच्छीमार बांधवांचा मंगळवारी मोर्चा आयोजित केला होता

विशेष प्रतिनिधी अलिबाग : महाराष्टÑ मच्छीमार कृती समितीतर्फे  महाराष्टÑातील किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांवर होत असलेल्या अन्यायाबाबत न्याय मिळविण्यासाठी मुंबई येथे महाराष्टÑ विधान भवनावर मच्छीमार बांधवांचा मंगळवारी मोर्चा आयोजित केला होता, त्याच्याच समर्थनार्थ राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांना कृती समितीच्या शिष्टमंडळाने निवेदन देण्याच्या नियोजनानुसार रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांना निवेदन देण्यात आले. रायगड जिल्ह्याशी निगडित समस्यांबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती महाराष्टÑ मच्छीमार कृती समितीचे चिटणीस उल्हास वाटकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात एकूण १४ प्रमुख मागण्या नमूद करण्यात आल्याचे वाटकरे यांनी सांगितले. याच मागण्याच्या अनुषंगाने १८ जुलै २०१७ रोजीदेखील निवेदन दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले; परंतु अपेक्षित कार्यवाही शासनाकडून झाली नसल्याचे सांगितले. मागण्याच्या अनुषंगाने बोलताना ते म्हणाले, शेतकºयांप्रमाणे समस्त मासेमारांची सरकारी बँकाकडील कर्जमाफी करण्यात यावी, पर्ससिन नेट बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करून बंदीचा परिसर १२ सागरी मैलांऐवजी ६० सागरी मैल करण्यात यावा, मासेमारी साधने जीएसटीमधून वगळण्यात यावीत, मच्छी व्यवसायाच्या प्रगतीसाठी डिझेल तेलाच्या किमती मर्यादित ठेवण्यात याव्यात,ओएनजीसी प्रकल्पबाधित कोळी बांधवांना २००५पासून नुकसानभरपाई मिळालेली नाही, ती तत्काळ देण्यात यावी, मच्छीमार बांधवांना मारक ठरणारी वाढवण व जिंदाल बंदरे सरकारने रद्द करावीत, मच्छीमारांच्या घराखालील व वाहिवाटीतील जमिनी मच्छीमारांच्या नावे कराव्यात, मुंबईच्या अरबी समुद्रातील श्री शिवछत्रपती स्मारक अन्यत्र हलवण्यात यावे, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द करण्यात यावा, मुंबईतील मच्छीविक्रेत्या महिलांना त्याच्या ताब्यातील गाळे वा फलाट हे कायम नावे करून मिळावेत, मुंबईच्या विकास आराखड्यातून कोळीवाडे वाचविण्यात यावेत, सी.आर.झेड. कायद्याची अंमलबजावणी कडकपणे करण्यात यावी, राष्टÑीय केमिकल अ‍ॅण्ड फर्टिलायझर, थळ या खत कारखान्यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई मिळावी, डिझेल परतावा मिळण्यास होणारा विलंब थांबविण्यात यावा आदी सर्व मागण्या नमूद असून, त्याबाबत मागणीनिहाय चर्चा करण्यात आल्याचे वाटकरे यांनी सांगितले.निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.