शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वर्षापासून सेवांचा विस्तार, आयुक्तांनी केली रुग्णालयाची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 00:05 IST

Navi Mumbai : ऐरोली आणि नेररळ येथील ररग्णालयाच्या इमारतीत १ जानेवारीपासून आयसीयू व मेडिसीन वॉर्ड सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.

नवी मुंबई : नेरुळ व ऐरोली येथील रुग्णालयांच्या इमारतीत सर्वसाधारण रुग्णालय सुरू करण्याच्या दृष्टीने महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. त्याअनुषंगाने संबंधित विभागाला दिलेल्या निर्देशांचे पालन झाले आहे की, नाही याची तपासणी करण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सोमवारी नेरुळ येथील रुग्णालयाच्या इमारतीला अचानक भेट देऊन पाहणी केली.ऐरोली आणि नेररळ येथील ररग्णालयाच्या इमारतीत १ जानेवारीपासून आयसीयू व मेडिसीन वॉर्ड सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाला काही सूचना केल्या होत्या. त्याची अंमलबजावणी झाली आहे की, नाही याची तपासणी बांगर यांनी यावेळी केली. तसेच सध्या सुरू असलेल्या आरोग्य सेवांची पाहणी करताना या ठिकाणी नेत्रचिकित्सा, कान-नाक-घसा तपासणी, त्वचाविकार, मानसोपचार, मेडिसीन या बाह्यरुग्ण सेवाही सुरू करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. त्यानुसार १ जानेवारीपर्यंत या बाह्यरुग्ण सेवाही सुरू करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ पूर्तता करण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले .ऐरोलीप्रमाणेच नेरुळ रुग्णालयातही कोविडपश्चात उपचार केंद्र सुरू असून त्याची माहिती नागरिकांना होण्यासाठी व्यापक स्वरूपात प्रसिध्दी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असली तरी कोरोना संसर्गानंतर वैद्यकीय सेवेची गरज असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अशा नागरिकांसाठी महापालिकेची उपचार सेवा उपलब्ध असल्याची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.या पाहणी दौऱ्यात काही फायर एक्स्टिंग्युशर या अग्निशमन उपकरणाचा वापर कालावधीची मुदत उलटून गेल्याचे निदर्शनास आले. याविषयी बांगर यांनी नाराजी व्यक्त करीत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. बालरोग वॉर्डमध्ये दाखल होणारी रुग्णसंख्या कमी दिसत असून अधिक चांगल्या रुग्णसेवेवर भर देण्याच्या सूचना केल्या. रुग्णालयाच्या रेकॉर्ड रूमच्या सद्यस्थितीबाबत नाराजी व्यक्त करीत १५ दिवसात अभिलेख अधिनियमानुसार रेकॉर्ड रूम अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत.

दोन टप्प्यात विस्तार१ जानेवारीला पुरुष व महिलांसाठी प्रत्येकी १५ बेड्सचे मेडिकल वॉर्ड व १० बेड्सचा आयसीयू वॉर्ड सुरू करण्यासाठी आवश्यक ती संपूर्ण कार्यवाही करण्याची जबाबदारी वैद्यकीय अधीक्षकांवर सोपविण्यात आली आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात १ फेब्रुवारीपासून सर्जिकल वॉर्ड व सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया सुरू करण्याचेही नियोजन असल्याचे आयुक्त बांगर यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई