शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

केंबुर्ली वळणाचे रुंदीकरण होऊनही धोका कायम

By admin | Updated: November 29, 2014 22:24 IST

मुंबई-गोवा महामार्गावरील केंबुर्ली गावाजवळ असलेल्या धोकादायक वळणावर गेली अनेक वष्रे अपघात होत आहेत. या धोकादायक वळणाचे रुंदीकरण करण्यात आले

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील केंबुर्ली गावाजवळ असलेल्या धोकादायक वळणावर गेली अनेक वष्रे अपघात होत आहेत. या धोकादायक वळणाचे रुंदीकरण करण्यात आले असले तरी अवघड वळणावर समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अपघातांचा धोका कायम आहे. शुक्रवारी सकाळी पुन्हा एक कार या वळणाचे कठडे तोडून नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. 
मुंबई-गोवा महामार्गावर केंबुर्ली गाव आणि महाड शहरादरम्यान महामार्गाला एक धोकादायक वळण आहे. या ठिकाणी नदीला लागूनच रस्ता पुढे गेला आहे. महाड शहराला जोडणारा जोडरस्तादेखील याच  ठिकाणी आहे. यामुळे येथे कायम अपघात होत असतात. गेल्या अनेक वर्षात या वळणावर अनेक अपघात झाले असून या अपघातांमध्ये मोठय़ा प्रमाणात जीवितहानी झालेली आहे. कायम अपघात होत असल्याने महामार्ग बांधकाम  विभागाने या ठिकाणी असलेला एका बाजूचा डोंगर फोडून रस्ता रुंद करण्याचे काम केले होते. मात्र रुंदीकरणामुळे हे वळण अधिकच धोकादायक बनले आहे. यामुळे या वळणावर आजही अपघातांचे प्रमाण कायम राहिले आहे. 
या वळणावर असलेले हे सिमेंट काँक्रीटचे संरक्षक कठडे रात्रीच्या वेळेस चालकांना स्पष्ट दिसत नाहीत. कठडय़ांना रेडीयम पट्टे बसवण्यात आलेले नाहीत. या वळणावर असलेली डोंगराकडच्या साइडपट्टीला खड्डे पडले आहेत. तर महाड शहराला जोडणा:या जोड रस्त्यासमोर खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकवण्याच्या प्रय}ातही अनेक अपघात होत आहेत. 
केंबुर्ली  वळणावर जानेवारी 2क्क्9 पासून आतार्पयत जवळपास 35 अपघात झाले आहेत. काही अपघात किरकोळ असल्याने याची नोंद करण्यात आलेली नाही. या किरकोळ अपघातांचा आकडादेखील किमान 25 पेक्षा अधिक आहे. (वार्ताहर)