शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘खारभूमी’ची बांधकामे प्रगतिपथावर

By admin | Updated: March 17, 2017 05:51 IST

मुंबई जलसंपदा विभाग, नाशिक यांत्रिकी विभाग व प्रकल्प संचालक ठाणे यांच्या सहयोगाने महाराष्ट्र शासनाच्या यांत्रिकी विभागाची यंत्रसामग्री रायगड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर

अलिबाग : मुंबई जलसंपदा विभाग, नाशिक यांत्रिकी विभाग व प्रकल्प संचालक ठाणे यांच्या सहयोगाने महाराष्ट्र शासनाच्या यांत्रिकी विभागाची यंत्रसामग्री रायगड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त झालेल्या खारभूमी योजनांच्या दुरुस्तीसाठी उपलब्ध झाली आहे. ही दुरु स्तीची कामे सुरू झाली असल्याची माहिती ठाणे खारभूमी विकास मंडळ कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.नोव्हेंबर २०१६मध्ये अलिबाग तालुक्यातील माणकुले या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या योजनेच्या बांधाच्या दुरुस्तीचे सुमारे १६०० मी. लांबीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर डिसेंबर २०१६ व जानेवारी २०१७ मध्ये जांभूळटेप खारभूमी योजनेचे सुमारे ८०० मी. बांधाचे माती काम पूर्ण करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत सोनखार उर्णोली या योजनेच्या दुरुस्तीचे काम प्रगतिपथावर आहे.यापूर्वी मार्च २०१६मध्ये कोकणातील सर्वात मोठ्या नारवेल-बेनवले या नादुरु स्त झालेल्या योजनेचे दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. सोनखार उर्णोली या योजनेचे दुरु स्तीचे काम काही प्रमाणात पूर्ण करण्यात आले. या सर्व योजनांच्या दुरुस्तीची कामे केल्यामुळे खारभूमी योजनांच्या पुन:प्रापित क्षेत्रात जाणाऱ्या समुद्राच्या भरतीच्या खाऱ्या पाण्यास अटकाव होऊन, क्षेत्र पिकाखाली येऊ शकणार आहे.यांत्रिकी विभागाची यंत्रसामग्री पेण येथील खारभूमी विकास विभागास कायमस्वरूपी लवकरच प्राप्त होणार असून, त्या यंत्रसामग्रीद्वारे समुद्राच्या उधाणामुळे बांधाला पडणाऱ्या खाडीच्या दुरुस्तीचे काम वेळीच पूर्ण करणे शक्य होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)