शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

खंडित ट्रॅक अन् रस्त्याच्या कडेला पट्टे...; नवी मुंबईत फसला प्रयोग, ट्रॅकचा लहानांनाच उपयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 06:29 IST

सायकलप्रेमींचा जीव धोक्यात: पामबीच मार्ग, सायन-पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूर रस्स्ता येथे सायकलप्रेमी सराव करतात. येथून भरधाव वाहने जात असल्याने अपघाताचा धोका असतो.

नामदेव मोरेनवी मुंबई - महापालिकेने सहा ठिकाणी स्वतंत्र सायकल ट्रॅक विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. पामबीच मार्गाला लागून नेरूळमध्ये ट्रॅक विकसित करण्यात आला, परंतु इतर ठिकाणी जागा नसल्यामुळे स्वतंत्र ट्रॅकऐवजी मुख्य रस्त्याच्या कडेला सायकलसाठी पट्टे मारण्यात आले, परंतु हा प्रयोग सपशेल फसला आहे.

मुंबई, ठाणेमधील सायकलप्रेमीही अनेकदा नवी मुंबईतून पुणे आणि गोव्याच्या दिशेने सायकलिंगला प्राधान्य देतात. यासाठी सायन-पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूर रस्ता व पामबीच मार्गाचा वापर केला जातो. फेब्रुवारी २०२४ मध्ये इंटेल इंडिया कंपनीचे माजी प्रमुख अवतार सैनी यांचा पामबीच मार्गावरून सायकल चालवत असताना कारने धडक दिल्याने मृत्यू झाला होता. यानंतर पालिकेने शहरात सहा ठिकाणी ४० किलोमीटर अंतराचा सायकल ट्रॅक विकसित करण्याचा निर्णय घेतला.

बेलापूर, नेरूळ, ऐरोली व घणसोली येथे हे ट्रॅक विकसित केले जाणार होते. पामबीच मार्गाला लागून सारसोळे ते सीवूडच्या दरम्यान ट्रॅक करण्यात आला आहे, परंतु या मार्गात चार ठिकाणी रस्ता खंडित झाला आहे. लहान मुलांना सायकल चालविण्यासाठीच त्याचा वापर होत आहे. महापालिकेने वाशी सागर विहार परिसर, वंडर्स पार्कबाहेरील रस्ता, घणसोली पामबीच मार्ग व इतर काही ठिकाणी मुख्य रस्त्याच्या कडेला सायकलसाठी हिरवे पट्टे मारले होते, परंतु याचाही सायकलसाठी उपयोग होत नाही. 

येथे होता सायकल ट्रॅकचा प्रस्तावपामबीच मार्गाच्या समांतर रस्त्यावर नवी मुंबई परिसरात ९ किमी.ऐरोली डीएव्ही शाळा ते सेक्टर १४, १५ परिसर ३ किमी.पटनी रस्त्यावर इच्छापूर्ती गणेश मंदिर ते पटनी कंपनीपर्यंत ६ किमी.ज्वेल्स ऑफ नवी मुंबई परिसरात बेलापूर रमाबाईनगर ते खारघरपर्यंत ४ किमी.

युलू सायकलही अल्पावधीत बंद महापालिकेने शहरात सायकल वापर वाढावा, यासाठी युलू सायकल उपलब्ध करून दिल्या होत्या. रेल्वे स्थानक, बसडेपो व महत्त्वाच्या ठिकाणी या सायकल ठेवण्यात येत होत्या. अल्प दरात नागरिकांना सायकलचा वापर करता येत होता, परंतु योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे हा प्रयोगही फसला.

महापालिकेने नेरूळ येथे सायकल ट्रॅक तयार केला आहे. वाशी, घणसोली व इतर काही रस्त्यांच्या कडेला स्वतंत्र पट्टे मारले आहेत. शक्य असेल तेथे सायकलसाठी व्यवस्था करण्याचा प्रयत्न आहे.- शिरीष आरदवाड, शहर अभियंता

सायकलसाठी लहान मार्गिकांचाउपयोग हाेत नाही.  नेरुळ आणि इतर ठिकाणचे ट्रॅक लहान मुलांना उपयोगी ठरतात. लांब पल्ल्याचा सराव करण्यासाठी गैरसोय होत असून, जीव धोक्यात घालून पामबीच व महामार्गाचा वापर करावा लागतो. - किरण ढेबे, सायकलप्रेमी

English
हिंदी सारांश
Web Title : Navi Mumbai's cycle track experiment fails; only kids benefit.

Web Summary : Navi Mumbai's cycle track project falters. Dedicated lanes are fragmented, proving useful mostly for children. Cyclists still risk using highways due to inadequate infrastructure despite efforts.
टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका