शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरला मिळणार भोज धरणातील पाणी

By admin | Updated: November 14, 2015 02:11 IST

संपूर्ण ठाणे जिल्ह्यात ३० ते ३७ टक्के पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असले तरी या पाणीकपातीचा सर्वात कमी त्रास हा बदलापूरकरांना होणार आहे

बदलापूर : संपूर्ण ठाणे जिल्ह्यात ३० ते ३७ टक्के पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असले तरी या पाणीकपातीचा सर्वात कमी त्रास हा बदलापूरकरांना होणार आहे. ऐन पाणीसंकटाच्या वेळी बदलापूरकरांना कोंडेश्वर येथील भोज धरणातून पाणी मिळणार आहे. त्यामुळे ही पाणीकपात कमी होण्याचे आणि वेळेवर रद्द होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. बदलापूर हे शहर सर्वात जलद गतीने वाढणारे शहर म्हणून नावारूपाला आले. शहर वाढत असले तरी पाण्याचे स्रोत मात्र तेवढेच असल्याने बदलापूरकरांना आधीच पाणीसंकटाला सामोरे जावे लागत होते. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी आमदार आणि तत्कालीन कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष किसन कथोरे यांनी बदलापूर शहराच्या हद्दीपासून ३ किमी अंतरावर असलेल्या भोज धरणातील पाणी बदलापूरला मिळावे, यासाठी शासनाकडे मागणी केली होती. या मागणीनुसार शासनाने २०१३ मध्ये आदेश काढून शहराला या धरणातील पाणी देण्याचे मान्य केले होते. मात्र, दोन वर्षांत यासंदर्भातील करारनामा न केल्याने ते पाणी बदलापूरकरांना मिळालेच नाही.मात्र, यंदा पाऊस कमी झाल्याने पाणी समस्येवर मार्ग काढण्यासाठी कथोरे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी संबंधित विभागाशी लागलीच करारनामा करून या धरणातील पाणी सोडण्यास अंतिम मंजुरी मिळविली आहे. यामुळे समस्या सुटण्याचे संकेत मिळत आहेत.