शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टीकचा २२०० किलोचा साठा जप्त

By admin | Updated: July 7, 2017 06:39 IST

शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. एपीएमसी व बेलापूर

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. एपीएमसी व बेलापूर परिसरामध्ये धाड टाकून २२०० किलो वजनाच्या प्लास्टीक पिशव्या जप्त केल्या आहेत. नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी पदभार स्वीकारल्यापासून प्लास्टीकमुक्त शहर बनविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न सुरू केले आहेत. स्वत: प्लास्टीक पिशव्यांचा वापर बंद केला असून शहरवासीयांनाही प्लास्टीक न वापरण्याचे आवाहन केले आहे. दुकानदारांनी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांची विक्री करू नये असे स्पष्ट बजावले असतानाही अनेक दुकानदार नियम धाब्यावर बसवून प्लास्टीक पिशव्यांची विक्री करत आहेत. अशा दुकानदारांवर कारवाई सुरू केली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातील कृषी प्लाझा इमारतीमधील दुकानांमध्ये धाड टाकली. तेथे १०१ गोणींमध्ये तब्बल २२०० किलो प्लास्टीक पिशव्यांचा साठा सापडला आहे. या पिशव्यांची वाहतूक करण्यासाठी एमएच ०४ जीएफ ८४२२ क्रमांकाचा टेंपोचा वापर केल्याचे स्पष्ट झाले असून तो टेंपोही जप्त करण्यात आला आहे. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार विभाग अधिकारी अंगाई साळुंखे यांच्या नियंत्रणाखाली पालिकेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. बेलापूर विभागामध्ये सेक्टर ११ येथील साईनाथ वाईन्स व परशुराम गावडे शॉप सेक्टर ५० नेरूळ येथील मोहन चौधरी शॉप, ओमकार मेडिकल अँड जनरल स्टोअर्स, भैरवनाथ डेरी, सेक्टर १५ सीबीडी बेलापूर येथील शिवआरती डेअरी या सहा दुकानांमधून ७ किलो ३०० ग्रॅम इतका ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा साठा जप्त करून प्रत्येकी ५ हजारप्रमाणे ३० हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल केली आहे. अशाप्रकारची प्लास्टीकविरोधी मोहीम संपूर्ण महापालिका कार्यक्षेत्रामध्ये राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.