शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

VIDEO: तुमचं शिरकाण करून कुत्र्यांना खायला घालू; पाकिस्तानातील मौलवीची हिंदूंना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 9:58 AM

मंदिराला पाठिंबा देणाऱ्यांना मौलवीची थेट धमकी; पाकिस्तानातील मंदिराचं काम थांबलं

इस्लामाबाद: अनेकांनी विरोध केल्यानं इस्लामाबादमधील हिंदू मंदिराचं बांधकाम थांबवण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या राजधानीत पहिलं मंदिर उभारण्यात येत होतं. मात्र मुस्लिम समाजातील काही कट्टरपंथियांनी विरोध केल्यानं गेल्याच आठवड्यात मंदिराचं बांधकाम थांबवण्यात आलं. मात्र आता या मंदिराला पाठिंबा देणाऱ्यांना कट्टरपंथियांकडून धमक्या दिल्या जाऊ लागल्या आहेत.इस्लामाबादमध्ये श्रीकृष्ण मंदिराचं सुरू असलेलं काम गेल्याच आठवड्यात थांबवलं गेलं. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग पक्षानंदेखील मंदिरावर आक्षेप नोंदवला. मंदिराची उभारणी इस्लामविरोधी असल्याचं म्हणत खान यांच्या पक्षानं मंदिर उभारणीला विरोध केला. यानंतर आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक मौलवी मंदिराला पाठिंबा दर्शवणाऱ्यांचं शिरकाण करण्याची धमकी देताना दिसत आहे. मंदिराजवळ तुमचा शिरच्छेद करून कुत्र्यांना खायला घालू, अशा शब्दांमध्ये मौलवीनं श्रीकृष्ण मंदिराला पाठिंबा दर्शवणाऱ्यांना थेट धमकी दिली आहे. राजधानी विकास प्राधिकरणानं (सीडीए) गेल्याच आठवड्यात मंदिराचं काम थांबवलं. मंदिराच्या जमिनीशी संबंधित कायदेशीर मुद्दे उपस्थित करून हे काम थांबवलं गेलं. इमारत नियंत्रण विभागाच्या (बीसीएस) अधिकाऱ्यांनी शुक्रवारी मंदिराचं बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाला भेट दिली. इमारतीचा आराखडा जमा करून त्याला मंजुरी मिळाल्यानंतर पुढचं बांधकाम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.इस्लामाबादमधल्या एच-९ प्रशासकीय विभागातील २० हजार चौरस फूट जमिनीवर मंदिर उभारण्यात येणार आहे. मानवाधिकार विभागाचे संसदीय सचिव लाल चंद माल्ही यांनी मंदिरासाठी भूमिपूजन केलं होतं. मात्र सध्या तरी त्याचं बांधकाम थांबवण्यात आलं आहे. त्यातच आता मुस्लिम कट्टरपंथियांकडून मंदिराला पाठिंबा देणाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत.