पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये महिलांनी घडविले सत्तांतर; महिलांचे मतदान जास्त, मात्र आमदारांची संख्या मर्यादित
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 10:54 IST2026-05-09T10:53:41+5:302026-05-09T10:54:26+5:30
विशेष म्हणजे पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या सर्व राज्यांमध्ये महिला मतदानाची टक्केवारी पुरुषांपेक्षा अधिक राहिली.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये महिलांनी घडविले सत्तांतर; महिलांचे मतदान जास्त, मात्र आमदारांची संख्या मर्यादित
नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांत देशातील अनेक राज्यांमध्ये विक्रमी मतदानाची नोंद झाली असून, महिला मतदारांनी पुरुषांपेक्षा अधिक उत्साहाने मतदान केल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या सर्व राज्यांमध्ये महिला मतदानाची टक्केवारी पुरुषांपेक्षा अधिक राहिली.
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
पाच राज्यांच्या निवडणुकीत झालेले मतदान आणि महिलांचा सहभाग
राज्य मतदान (%) महिला (%) पुरुष (%) एकूण मते एकूण मतदार
पश्चिम बंगाल ९३.७१% ९३.८% ९२.०६% ६.३८ कोटी ६.८१ कोटी
तामिळनाडू ८५.०१% ८६.२% ८३.७७% ४.८ कोटी ५.७४ कोटी
आसाम ८५.७४% ८६.५३% ८४.९५% २.१५ कोटी २.५१ कोटी
केरळ ७८.११% ८१.१७% ७४.९% २.१२ कोटी २.७२ कोटी
पुद्दुचेरी ८९.८२% ९१.३९% — ८.५ लाख ९.४७ लाख
तामिळनाडूत सर्वाधिक उमेदवार
तामिळनाडूत उमेदवार संख्या अधिक होती. येथे २३४ मतदारसंघांत ४,०२३ उमेदवार रिंगणात होते. म्हणजे एका जागेसाठी सरासरी १७ उमेदवार होते. एका मतदारसंघात तर ७९ उमेदवार मैदानात होते. पश्चिम बंगालमध्ये २,९२० उमेदवारांनी निवडणूक लढवली, तर केरळमध्ये १४० जागांसाठी ८८३ उमेदवार होते.
महिला आमदारांचे प्रतिनिधित्व
राज्य जागा महिला टक्केवारी
तामिळनाडू २३४ २३ ९.८३%
पश्चिम बंगाल २९३ ३७ १२.६२%
केरळ १४० ११ ७.८५%
नोटाला किती झाले मतदान?
राज्य नोटा मतदान (%)
तामिळनाडू ०.४%
आसाम १.२३%
पश्चिम बंगाल ०.७८%
पुद्दुचेरी ०.७७%
केरळ ०.५७%