शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

कुजबूज--3 सद्गुरू

By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST

नगरसेवक खवळले

नगरसेवक खवळले
पणजी महापालिकेचे नगरसेवक सध्या खवळलेत. चूक त्यांची नाही. महापालिकेने जो कंत्राटदार नेमला तो सध्या लोकांना पिडतोय. पणजीत चुकीच्या ठिकाणी वाहन पार्क करणार्‍यांविरुद्ध कारवाई व्हायलाच हवी; पण या कंत्राटदाराची माणसे थेट चारशे रुपयांचा दंड वाहनधारकाला ठोठावतात. चारशेपैकी शंभर रुपये पोलिसांच्या वाहतूक विभागाला जातात. शंभर रुपये महापालिकेला व दोनशे रुपये कंत्राटदाराच्या खिशात जातात. आपली लुट सुरू आहे, अशी तक्रार बहुतेक वाहनधारक सध्या पणजीत करत आहेत. महापौरांकडेही लोकांच्या खूप तक्रारी येतात व नगरसेवकांकडेही वाहनधारक येऊन रडतात. महापालिकेचे विद्यमान महापौर शुभम चोडणकर यांनी हे कंत्राट दिलेले नाही. आयुक्त संजित रॉड्रिग्स यांनी ते कंत्राट दिलेय. त्या वेळी चोडणकर महापौर नव्हते. आता सुमारे वीस नगरसेवकांनी मिळून एक निवेदन महापौरांना दिले आहे.


भाजपचे नगरसेवक
पणजीतील भाजपचे एक-दोन नगरसेवक सध्या महापौरांवर खूपच नाराज आहेत. ते महापालिका कुठे चुकते का, महापौर कुठे चुकतात का, याचीच वाट पाहतात. महापौरांना महापालिका व्यवस्थित चालविता येत नाही, कामे करता येत नाहीत असा प्रचार असंतुष्ट नगरसेवक करतात. भाजपचा एक नगरसेवक तर माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांच्या कार्यालयात जाऊन स्ट्रेटेजी ठरवून आला आहे. महापौर शुभम चोडणकर यांचे आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर यांच्याशी चांगले संबंध आहेत आणि सिद्धार्थांचे र्पीकरांशी. त्यामुळे चोडणकरांचे आसन भक्कम. मात्र, आयुक्त संजित रॉड्रिग्स कुठच्याच महापौराला जास्त जुमानत नाहीत. ते आपण म्हणजेच महापालिका असे समजतात; कारण त्यांचेही र्पीकरांशी चांगले संबंध.